कळमगाव (गन्ना) येथे संविधान सन्मान दिन तथा महात्मा फुले स्मृतिदिन सोहळा संपन्न

43

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

सिन्देवाही(दि.29नोव्हेंबर):-तालुक्यातील कळमगाव गन्ना येथे ग्रामिण फुले-शाहु आंबेडकर विचार मंच व नगर बौध्द पंच कमेटी यांच्या संयुक्त विद्यमानाने संविधान सन्मान दिन समारोह तथा राष्ट्रपिता महात्मा फुले स्मृतिदिन सोहळा दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ ला राजा बिंबीसार बुध्दविहार कळमगाव गन्ना येथे संपन्न झाला.सदर कार्यक्रमाचे नियोजन दिवसभरात चार सत्रामध्ये करण्यात आले होते. पहिल्या सत्रामध्ये सकाळी ६ ते ९ पर्यंत गावामधुन संविधान सन्मान दिवसानिमित्य रॅली काढण्यात आली. त्यात नवेगाव लोन व पळसगाव जाट येथील समता सैनिक दलाचे पथसंचालन व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.

दुसर्या सत्रामध्ये दुपारी १ ते ५ पर्यंत संविधान सन्मान दिन तथा राष्ट्रपिता महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा.प्रताप नगराळे सर,प्रमुख मार्गदर्शक निखिल ठमके सर, बळीराज निकोडे सर, प्रमुख अतिथी बाबुरावजी गेडाम, डाॅ. राजपाल खोब्रागडे, गेंदबाजी खोब्रागडे, डाॅ. रविन्द्र शेंडे, मोटघरे सर, सेमस्कर सर यांचे वैचारीक भाषणे झालीत.

तिसर्या सत्रामध्ये सायंकाळी ५ ते ७ पर्यंत सस्नेह भोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. चवथ्या सत्रामध्ये सायंकाळी ७ वाजतापासुन भव्य एकल नृत्य स्पर्धा खुला गट घेण्यात आला. त्यात प्रथम पारितोषिक ७०००/- व्दितीय ५०००/- व तिसरे ३०००/- ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटक अरविंद जैस्वाल, दीपप्रज्वलन मदारे सर, अध्यक्ष अशोक खोब्रागडे, प्रमुख अतिथी प्रभुदास चौधरी, हटवादे मॅडम, मुकेश बन्सोड, दशरथ मडावी, सुदाम खोब्रागडे, शिरीष चांभारे, राजु चांभारे, राजु सरपाते, लताताई गेडाम हे उपस्थित होते.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कळमगाव ग्रामिण फुले-शाहु आंबेडकर विचार मंच, समता जनकल्याण प्रतिष्ठाण, रमाबाई महिला मंडळ, बौध्द समाज कळमगाव गन्ना यांनी केले होते. यात भारत शेंडे, अमरदिप मेश्राम, प्रविण मेश्राम, कोमल गेडाम, अमित जुंबळे, राहुल खोब्रागडे, अमित मेश्राम, प्रफुल्ल वाकडे, अनिल जुंबळे, अक्षय रामटेके, अतुल जुमळे, वैभव वाकडे, रुंदन गेडाम, रोशन खोब्रागडे, प्रशांत अलोणे, विक्की गेडाम, शिलानंद रामटेके, संतोष वाकडे, शाहुर खोब्रागडे, राहुल गेडाम, राष्ट्रपाल रामटेके, प्रणय गेडाम, मंगेश वाकडे, स्वप्निल जुंबळे, भगवान जुंबळे, शुभम निमगडे, प्रणित गेडाम, प्रफुल्ल गेडाम, पियुष शेंडे, भारत गेडाम, स्नेहल गेडाम, जगदिश खोब्रागडे, सुरज खोब्रागडे, हिनयान खोब्रागडे, प्रफुल्ल खोब्रागडे, संघपाल खोब्रागडे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

महातपुरी येथील प्रकाश डबडे यांचा अपघाती मृत्यू