फुलसिंग नाईक महाविद्यालयात मराठी भाषा व साहित्य अभ्यास मंडळाचा उद्घाटन सोहळा संपन्न

27

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.30नोव्हेंबर):-फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद येथे मराठी पदवी व पदव्युत्तर विभाग अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२२ – २०२३ मधील ‘मराठी भाषा व साहित्य मंडळ उदघाटन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. अनिल पाटील सर होते. प्रमुख पाहुणे व उदघाटक म्हणून राजस्थान आर्यन महाविद्यालयाचे मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विजय जाधव सर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रल्हाद वावरे सर यांनी करून दिली.

यावेळी प्रमुख पाहुणे व अध्यक्षांसह मराठी विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. अनिता कांबळे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची पीएचडी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा. सुषमा भटकर व शिलानंद कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. एम.ए. मराठी चा विद्यार्थी हरिष चव्हाण याचा विद्यापीठ स्तरावर ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. बी.कॉम. (भाग-३) ची विद्यार्थीनी कु. रोशनी राठोड यांना मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल पुस्तक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला प्रा डॉ. भोयर सर, डॉ. दत्ता पवार सर, प्रा. विलास भवरे सर, प्रा. महेश हंबर्डे सर, प्रा. डॉ. कांबळे मॅडम, प्रा. प्रवीण आडे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. महेश हंबर्ड यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. शिरमवार सर व मराठी भाषा व साहित्य मंडळाचे सर्व पदाधिकारी स्वप्नील गोरे, ऋषिकेश जोगदंडे, अब्दुल अयान, वैष्णवी रुणवाल, गौरी राठोड, नागसेन सुरोशे, नितेश राठोड, हरिष चव्हाण आदींनी मोलाचे सहकार्य केले.

आरती श्री संविधान जी की …

https://www.purogamiekta.in/2022/11/30/56215/