जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पीरवाडी येथे अपंग बेरोजगार व पुनर्वसन संस्था यांचा मेळावा संपन्न

30

✒️डॉ सुरेश राठोड(कोल्हापूर प्रतिनिधी)

कोल्हापूर(दि.3डिसेंबर):-अपंग दिनानिमित्त करवीर तालुक्यातील पिरवाडी येथे अपंग दिनाचे औचित्य साधून अपंग बेरोजगार व पुनर्वसन संस्था यांच्या वतीने भव्य अपंग मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक अपंग व्यक्तींना कायद्याचे मार्गदर्शन व सत्कार उपस्थित मान्यवर बेले गावच्या सरपंच नाजुका पाटील, सचिव संजय पोवार, पिरवाडी गावच्या सरपंच शिल्पा टेळके, माजी सरपंच आकाशी लाड, सदस्य सविता टेळके, सेवा सोसायटीचे चेअरमन विलास पवार, मनोहर खोत, दादासो फकीर, पत्रकार डॉ सुरेश राठोड, के, यस,रानगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव संजय पोवार बोलताना म्हणाले, स्वातंत्र्य दिव्यांग मंत्रालयामुळे दिव्यांगांच्या योजनांना गती मिळेल. दिव्यांग कल्याण पुनर्वसनाच्या मागण्यांसाठी राज्य व शासनाकडून अनेक शासन निर्णय काढून घेतली असताना देखील दिव्यांगांच्या विविध योजनांची अंमलबजावणी होत नव्हती. तसेच यापूर्वी देखील महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांसाठी शेकडो शासन निर्णय, परिपत्रके व आदेश काढून देखील दिव्यांग व्यक्ती विविध योजनेपासून वंचित राहत होता. पण आम्ही संघटनेच्या माध्यमातून या सर्व योजनांचा लाभ दिव्यांगांना मिळवून देऊ.

यानंतर डॉ सुरेश राठोड म्हणाले 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंगत्व दिन जगभरात साजरा केला जातो, सन 1992 पासून संयुक्त राष्ट्र संघातर्फे हा दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. शारीरिक व्याधीवर मात करून स्वतःचे सामर्थ्य सिद्ध करणारे स्टीफन हॉकिंग, हेलन केलर, लुईस ब्रेल, सुधा चंद्रन, ऑस्कर पिस्टोलियस, मसूर अली खान आधी दिगजांचे उदाहरण दिले व भविष्यात सर्व अपंग बंधूंच्या पाठीशी राहू अशी आश्वासन दिले.

या मेळ्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष बाळासो गायकवाड, बळवंत पाटील, सुजाता जाधव, यशवंत सातपुते, भिवाजी पाटील, मालुबाई शेळके, रामचंद्र खोत, नामदेव हराळे, सुमित शिंदे, पोपट पाटील इत्यादी पदाधिकारी तसेच दिपाली काटे, माधुरी धोत्रे, शिपाई सर्जेराव शेळके, प्रकाश लोखंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेळी होऊन शंभर दिवस जगण्या पेक्षा……!