पत्रकार संघाच्या भवनाकरिता ब्रह्मपुरी तालुका पत्रकार संघातर्फे पालकमंत्री यांना निवेदन

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि. 3 डिसेंबर):-ब्रह्मपुरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्रकार भावनांच्या निर्मिती करता दिनांक तीन डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले. यावेळी ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी यांना पालकमंत्री यांनी वेळीच सूचना देतांना शासकीय जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.

शिवाय खासदार अशोक नेते यांनी सुद्धा लक्ष केंद्रित करून माजी आमदार अतुल देशकर यांच्या पुढाकारातून त्वरित पत्रकारांच्या मागणी संदर्भात लक्ष द्यावे असे सांगितले.

यावेळी निवेदन देताना ब्रह्मपुरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय रामटेके सचिव गोवर्धन दोनाडकर , ज्येष्ठ पत्रकार जीवन बागडे, महेश पिलारे,नेताजी मेश्राम, प्रा. श्याम करंबे, मिश्रा सर, दिलीप शिंदखेडे,प्रशांत डांगे, विनोद दोनाडकर. दत्तात्रय दलाल, कृष्णा वैद्य, संतोष पिलारे, तर महाराष्ट्र पत्रकार संघापैकी प्राध्यापक संजय लांबे सर ,राहुल मैन्द, नंदू गुड्डेवार, राहुल भोयर, चंद्रशेखर सातव रुपेश देशमुख, उपस्थित होते

शेळी होऊन शंभर दिवस जगण्या पेक्षा……!