अब्दुल रशीद महाविद्यालयात पोलीस भरती वर्कशॉप संपन्न

32

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.5डिसेंबर):-महाराष्ट्र राज्य भरात निघालेल्या १८००० पेक्षा अधिक पोलिस भर्तीच्या जागे बद्दल शाळेतील व गावातील मुलांना जनजागृती होण्यासाठी अब्दुल रशीद उर्दू शाळा आणि ज्युनिआर कॉलेजतील मुख्याध्यापकां कडून वर्कशॉप सेमिनार आयोजित करण्यात आले होते या मध्ये मुलांच्या मागर्दशनासाठी पुसद येथील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा.सय्यद सलमान सै.शेरू सरांना आमंत्रित करण्यात आले होते.या वर्कशॉप मध्ये शाळेतील वर्ग 9 ते 12 इयत्तेतील 80 विध्यार्थी व गावातील 40 पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते या मध्ये सर्वच जाती धर्माचे मुलं मागर्दशनासाठी आले होते.

या वर्कशॉप ची सुरुवात स्वागत समारंभांने झाली कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व मार्गदर्शक प्रा.सय्यद सलमान सरांचे स्वागत रेहान खान सरांनी केले तर सरांनी केले तर सूत्र संचालन सय्यद मुज़फ्फर सरांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक मो.रिज़वान मो.हमीद सर होते स्वागत समारंभानंतर मुख्य मागर्दशनाला सुरवात झाली ज्यामध्ये प्रा.सय्यद सलमान सरांनी सुरवातीस शाळेच्या विद्यार्थ्यांना यु,पि,एस, सी व एम,पि,एस ,सी सारख्या केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षे बद्दल सुरवाती पासून शेवट पर्यत अत्यन्त साध्या व सोप्या भाषेत माहिती दिली.

तसेच UPSC/MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आता शालेय जीवनामध्ये कसा करता येईल जेणेकरून अधिकारी होपे होईल या बद्दल विस्तृत मागर्दशन केले व विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर बद्दल प्रश्न विचारून त्यांच्या मनातील शंका दूर केल्या व त्यानंतर प्रा.सय्यद सलमान सरांनी पोलीस भर्ती च्या फॉर्म भरण्या पासून ते शारीरिक चाचनी,लेखी परीक्षा या वर सविस्तर माहिती दिली फक्त फॉर्म भरून परीक्षा होत नसते तर त्या साठी फिजिकल आणि लेखी परीक्षेत चांगले मार्ग घ्यावे लागते आणि त्या करिता सरांनी मुलांना लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम व त्यासाठी लागणारे पुस्तके व महत्वाचे टॉपिक याबद्दल माहिती देऊन टाईम टेबल सुद्धा बनून दिले आणि मुलाच्या मनातील असलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊन त्यांना संतुष्ट केले.

सरांचे पूर्ण मार्गदर्शन 1 तासांपेक्षा अधिक चालले सरांनी मुलांना फळ्यावर खूप सारे महत्वाचे घटक लिहून सुद्धा दिले आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा शांत व लक्षपूर्वक ऐकले प्रा.सलमान सर अश्या प्रकारचे निशुल्क वर्कशॉप, सेमिनार, कार्यशाळा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घेऊन सम्पूर्ण जाती, धर्माच्या मुलांना स्पर्शा परीक्षेबद्दल व पोलीस भरती बद्दल जनजागृतीचे कार्य करत आहे. तसेच सरांनी मुलांना त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा दिला काही अडचणी आल्यास सर त्यांना ऑनलाइन सुद्धा मार्गदर्शन करतात त्यासाठी प्रा.सलमान सरांचा युट्युब चॅनल सुद्धा आहे.

https://www.purogamiekta.in/2022/12/05/56494/

मराठी भाषा अकॅडमी यावर ते ऑनलाइन मोफत मागर्दशन करतार अश्या प्रकारे या वर्कशॉपचा खूप फायदा झाला म्हणून आपल्या भावना जाहीर केल्या तसेच कार्यक्रम यशस्वी पार पडल्यानंतर आयोजकांनी प्रा सलमान सरांचे आभार व्यक्त केले व अश्या प्रकाच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या अश्या प्रकारे पोलीस भर्तीचा एक अभूतपूर्व वर्कशॉप पार पडला या कार्यशाळेच्या आयोजनासाठी मिर्जा साजिद बेग सर,अबुजर बिन मुसा सर,मो दानिश सर,साजिया मॅडम,ससायम बेग सर, मुजफ्फ सर या सर्व शिक्षकांना अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

https://www.purogamiekta.in/2022/12/05/56497/