महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेबांना विनम्र अभिवादन !…

31

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.6डिसेंबर):- शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात शाळेतील उपशिक्षक व्ही.टी.माळी यांनी बाबासाहेबांचा जीवनपट उलगडला व त्यांचे सामाजिक शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका एम.के.कापडणे व मुख्याध्यापक जे.एस.पवार यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

शाळेतील उपशिक्षक पी.डी.पाटील यांनी बाबासाहेबांचा महत्त्वपूर्ण गुण पुस्तक वाचनाचा मुलांसमोर विशद केला. ज्या महामानवाने पुस्तकांसाठी राजगृह निर्माण केले. मुलांनी किमान २ तास पुस्तक वाचन करावे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल. यानंतर व्ही.टी.माळी सर यांनी एक बाबासाहेबांच्या जीवनावर अरे सागरा… भीम माझा येथे निजला…. हे गीत सादर केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही.टी.माळी तर आभार एस.व्ही.आढावे यांनी मानले.

https://www.purogamiekta.in/2022/12/06/56591/