ने. हि. महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि. 6 डिसेंबर):-येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन कार्यक्रम घेण्यात आला.

सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ डी एच गहाणे व ज्येष्ठ प्रा डॉ सुभाष शेकोकरांनी माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.

यानंतर डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम, डॉ असलम शेख, डॉ किशोर नाकतोडे,डॉ तात्या गेडाम ,डॉ धनराज खानोरकर,डाॅ मोहन कापगते, डॉ भास्कर लेनगुरे,डाॅ युवराज मेश्राम, डॉ प्रकाश वट्टी, डॉ पद्माकर वानखडे,प्रा ववर्षा चंदनशिवे,डाॅ योगेश ठावरी,डाॅ रतन मेश्राम पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर,प्रा मोहूर्ले,रुपेश चामलाटे उपस्थित सर्वांनी पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

यशस्वीतेसाठी प्रभारी डॉ के के गिल,डाॅ खानोरकर, डॉ मेश्राम, प्रा विनोद घोरमडे,प्रा रुपेश वाकोडीकर यांनी परिश्रम घेतले.