जिल्ह्यातील शेतकरी होणार काँग्रेसच्या मोर्चात सहभागी

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.8डिसेंबर):- दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्याच प्रमाणे मेडिगट्टा धरणामुळे सतत जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. दोबार- तिबार पेरणी करून देखील शेतकऱ्यांच्या हाताला या वर्षी काही आलेले नाही. मोठ्या मोठ्या पीक विमा कंपन्या कडून शेतकऱ्याचे पीक विमा काढण्यात आले तर काही शेतकऱ्याच्या कृषी कर्जातूनच विमाची रक्कम कपात करण्यात आली. मात्र इतके नुकसान झाले असताना देखील जिल्ह्यातील बरेच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही.

एकीकडे सरकार स्वतः पीक विमा काढण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत असते तर दुसरीकडे विमा कंपन्या शेतकऱ्यांना त्याच्या विम्याचे पैसे देत नसतांना देखील सरकार गप्प असल्याने जिल्ह्यातील शेतकरी नाराज असून असे सर्व शेतकरी जिल्हा काँग्रेसच्या वतीने 14 ते 21 दरम्यान गडचिरोली ते नागपूर विधनभवनवर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची भेट घेऊन दिली.

जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांना निवेदन देताना शेतकरी महागु पीपरे, मेंगाजी कोडाप, गणपत पीपरे, देवाजी दांडीकवार, रुमाजी चिलंगे, कवडू भुरले, शामराव गंदलवार, निकेश कामीडवार सोबत अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे.

https://www.purogamiekta.in/2022/12/07/56669/