साताळी ग्राम पंचायत मध्ये नवनिर्वाचीत उपसरपंच पदी आयु, अमोल सोनवणे यांची बिन विरोध निवड

32

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.10डिसेंबर): – येवला तालुक्यातील साताळी गावाची काल उपसरपंच या पदाची निवड ग्रामसेवक शेख मडम व सरपंच सुनंदा पु. काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.उपसरपंच पदाची निवड सकाळी ९:०० वाजता चालू झाली आणि १०:०० वाजता संपली सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर होते निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली असता उपसरपंच पदासाठी अमोल शिवाजी सोनवणे यांच्या नावाचा एकमेव अर्ज दाखल झाला असता त्यांना सुचक म्हणून माजी उपसरपंच गणेश कोकाटे व अनुमोदन सुकदेव त्राबक काळे यांनी सही केली आहे.

त्या नंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अमोल सोनवणे यांच्या नावाचा एकमेव अर्ज आल्याने यांना बिनविरोध उपसरपंच म्हणून घोषित केले.

अत्यंत खेळीमेलिच्या वातावरणात निवडणूक पार पडली.
या उपसरपंच या निवडी साठी राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अर्जुन कोकाटे सर, भिका भाऊ सोनवणे, पंढरीनाथ काळे, मच्छीद्रनाथ काळे, दिलीप आप्पा काळे यांचे मोलाचे योगदान आहे.या निवडी साठी पि. केे काळे, ग्राम पंचायत सदस्य सुनीता कृष्णा कोकाटे, दादाभाऊं सोनवणे, भाऊसाहेब जगताप, संजय सोनवणे, तुलसीराम कोकाटे, कृष्णा कोकाटे, संतोष सोनवणे, ज्ञानदेव मोरे, वसंत मोरे, जालिंदर काळे, जालिंदर कोकाटे,सुदाम बापू , तसेच सर्व ग्राम पंचायत सदस्य व मोठ्या प्रमाणात ग्रामस्त हजार होते

समृद्धी महामार्ग -जितका प्रवास तितकाच पथकर !

आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग : समृद्धी महामार्ग…!