ग्रामसेवक संघटना व पंचायत समितीने निर्माण केली पाणी बचतीची निर्धार

32

🔹पंचायत समिती व ग्रामसेवक संघटेच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून बांधला रायपूर नाल्यावर वनराई बंधारा

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.12डिसेंबर):- वर्षानुवर्षे पहाडावर मोठ्या प्रमाणात निसर्गाचा पाऊस येतो माञ पाणी अडविले जात नसल्याने तालुक्यातील बाहूतांश गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.जमिनीवरून वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी करुन जास्तीत जास्त पाणी जमीनीमध्ये मुरविण्यासाठी वनराई बंधारे फायदेशीर ठरतात. जनावरांना पिण्यासाठी, वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मीळावे यासाठी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी भागवत रेजिवाड व ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष मुन्ना सिडाम यांच्या कल्पनेतून ग्राम पंचायत खडकी रायपूर अंतर्गत येणाऱ्या रायपूर याकोलामगुड्यात पाणी बचतीसाठी श्रमदानातून वनराई बंधारा साकारला आहे.

जिवती पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी भागवत रेजिवाड यांनी नवनविन उपक्रम राबवून नागरिकांना व ग्रामसेवकांना संबोधित करत.अतिदुर्गम भागात हलाकीचे जीवन जगणाऱ्या नागरिकांना भविष्यात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी लोकसहभागातून आवश्यक त्या ठिकाणी छोटे-छोटे बंधारे बांधून पाण्याची पातळी वाढविण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

            यावेळेस प्रामुख्याने उपस्थिती डॅा. भागवत रेजिवाड.गट विकास अधिकारी पंचायत समिती जिवती, ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष मुन्ना सिडाम,उपाध्यक्ष विनोद शेरकी,सचिव सचिन आदे,सरपंच सपना कोटनाके खडकी रायपुर,पंचायत विस्तार अधिकारी राजेंद्र बांबोडे, विस्तार अधिकारी काळे ग्राम विकास अधिकारी संजय रायपुरे,विस्तार अधिकारी किर्तीमंत मंगर,स.प्र.अधि.डुंबरे,कृषी विस्तार अधिकारी अतुल घोडमारे, कोषाध्यक्ष सचिन उईके,ग्रामसेवक नितीन नरड,ग्रामसेवक रवी बोरकर,ग्रामसेवक अजय राऊत, ग्रामसेवक सचिन राऊत,ग्रामसेवक पावरा,अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे प्रक्षेञ अधिकारी मोकिंद राठोड,अरविंद चव्हाण तालुक्यांतील सर्व ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, सर्व पंचायत समिती अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे समारोप वनभोजन करुन करण्यात आले.

चौदा वाड्या अन् एक स्मशानभूमी