पुसद तालुक्यातील हिवळणी येथे मुंडन करून उपोषणाचा पहीला दिवस..!!

33

🔹शेतकऱ्यांचा पीक विमा त्वरीत द्या..!!

🔸विम्यासाठी बेमुदत उपोषण

🔹मा. तहसीलदारांना २९ डीसेंबरचे अल्टिमेटम
__________________________
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.29डिसेंबर):- तालुक्यातील शेतकऱ्यांना चालू वर्षात पीक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा तसेच आजपर्यंत न मिळालेली महात्मा फुले शेतकरी सन्मान निधीचे अनुदान त्वरित देण्यात यावे या मागणीसाठी हिवळणी तलाव येथे बेमुदत उपोषण व मुंडण करून आंदोलन उभारण्यात आले आहे. या बाबत निवेदन आज शेतकऱ्यांच्या साक्षीने व शिष्टमंडळाने तहसिलदार पुसद यांना देण्यात आले आहे. पुसद तालुक्यात मागील वर्षाप्रमाणेच यावर्षी अतिवृष्टी झाली असुन अनेक शेतकरी वंचित असल्याचे पाहावयास मिळत आहे पंरतु अतिवृष्टीच्या भीतीमुळे जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा काढला होता. परंतु मोजक्याच शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळाला.

७० ते ८० टक्के शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळालाच नाही. ज्या काही २० टक्के शेतकऱ्यांना हा लाभ मिळाला त्यात काही शेतकऱ्यांना तर जेवढा विमा भरला होता त्याही पेक्षा कमी लाभ मिळाला. अर्ज विनंती करून प्रशासन ऐकत नसल्याचे लक्षात आल्यामुळे शेतकऱ्यांनी आज तहसीलदार पुसद यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री मा. महसूलमंत्री यांना तांडा सुधार समितीच्या बॅनर खाली एकत्र येऊन २९ डीसेंबर पासून हिवळनी तलाव येथे बेमुदत उपोषण व मुंडण सुरू करण्यात आले आहे अश्या प्रकारचे निवेदन देखील दिले आहे.

याप्रसंगी संजय मदन आडे तालुकाध्यक्ष तांडा सुधार समिती, कुबेराव मस्के तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, सुनिल देवराव चव्हाण सामाजिक कार्यकर्ते, गजानन इंदोरीया उपसरपंच हिवळणी, शैलेश सरगर सामाजिक कार्यकर्ते,पवन सुभाष राठोड जिल्हा सचिव व्हीजेएनटी सेल,गजानन धावजी राठोड सामाजिक कार्यकर्ते,दुर्गादास महाराज समाज सेवक, सुभाष पूना राठोड सामाजिक कार्यकर्ते,पंडित पवार सामाजिक कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते.