महाराष्ट्र मिनी ऑलिंपिक स्पर्धेसाठी वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या चार विद्यार्थिनीची निवड

34

✒️निफाड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.8जानेवारी):- श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या चार खेळाडू विद्यार्थिनीची पुणे बालेवाडी येथे होणाऱ्या महाराष्ट्र मिनी ऑलिंपिक स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली. कु. तपस्या काशीद हिची हॉलीबॉल स्पर्धा कर्णधार म्हणून निवड झाली.

कु. श्रुती जाधव (हॅमर थ्रो), कु. वेदांतिका पवार (कुस्ती ), श्री बाळू पुकळे (10000 मी. रनिंग), श्री शिवम जाधव (हॅमर थ्रो ), कु. पूजा वरेकर (हॉलीबॉल) अशी अभिनंदनीय निवड झालेल्या खेळाडू विद्यार्थ्याची नावे आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, कराडचे जनरल सेक्रेटरी मा. श्री प्रकाश पाटील (बापू ) तसेच महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.