‘मासिक पाळी व्यवस्थापन व स्त्रियांचे आरोग्य’ विषयावर तालुकास्तरीय उद्बोधन कार्यशाळा संपन्न

112

✒️परभणी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

परभणी(दि.12 जानेवारी):- सावित्री-जिजाऊ महोत्सवानिमित्याने होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्था व शिक्षण विभाग परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा, खाजगी अनुदानित शाळेतील महिला शिक्षकांसाठी व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील इयत्ता 8 वी ते 10 वीत शिकणाऱ्या मुली यांच्यासाठी ‘मासिक पाळी व्यवस्थापन व स्त्रियांचे आरोग्य’ या विषयावर तालुकास्तरीय उद्बोधन कार्यशाळा कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर येथे घेण्यात आली.

‘मासिक पाळी व्यवस्थापन’ विषयावर जनजागृती व्हावी म्हणून आयोजित सत्रात डॉ सौ आशा चांडक (मासिक पाळी समुपदेशन तज्ञ) व डॉ पवन चांडक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. जिंतूर तालुक्यात प्रथमच मा. गटशिक्षणाधिकारी श्री गणेशजी गांजरे साहेब यांच्या प्रयत्नातून महिला शिक्षीकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला 100 महिला शिक्षीका उपस्थित राहून उस्फुर्त सहभाग नोंदवला .

तसेच याप्रसंगी संपूर्ण परभणी जिल्ह्यात आयोजित जिल्हा स्तर व तालुका स्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा एचएआरसी संस्थे तर्फे गौरव करण्यात आला. या स्पर्धेमध्ये संपूर्ण विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मासिक पाळी संदर्भातील विविध विषयांवर सहभाग नोंदवला. जिल्हा स्तरावर चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रशाला बामणी येथील कु. वाकळे हिने मिळविला. तर जिंतूर तालुका स्तर चित्रकला स्पर्धेत प्रथम – कु भाग्यश्री माणिकराव काळे – इयत्ता 10 वी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चारठाना, द्वितीय: कु पल्लवी पांडुरंग वाघमारे – एकलव्य बाल विद्या मंदिर जिंतूर ,तृतीय: किरण राजू राठोड – कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर , उत्तेजनार्थ: कु शेख जिनत शेख सातार – जि.प. कें प्रा. शा. उर्दू 1 जिंतूर जिंतूर तालुका निबंध स्पर्धेत प्रथम- दीपाली रामेश्वर कदम प्रभुकृपा माध्यमिक विद्यालय वाघी (बो) , द्वितीय – आकांक्षा रंजित मानवते – जिल्हा परिषद प्रशाला करवली , तृतीय – वैष्णवी तुकाराम खापरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिडज , उत्तेजनार्थ: आकांक्षा विठ्ठल तिथे – जिल्हा परिषद माध्यमिक शाळा दुधगाव यांनी मिळविला.

निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी, बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर दोन स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. जिंतूर तालुक्यातील एकूण 500 विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ पवन चांडक यांनी केले. तर आभार श्रीमती तोडकर यांनी मानले. या प्रसंगी आयोजक एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, डॉ आशा चांडक, क्षितिजा तापडिया, गटशिक्षणाधिकारी गणेशजी गांजरे साहेब, विस्तार अधिकारी आमले साहेब, श्रीमती संगवई, प्रधान सर, नालंदे सर, केंद्रप्रमुख घुगे एम डी सर मुख्याध्यापिका राऊत मॅडम, क्रीडा शिक्षक सावळे सर, गृहप्रमुख व शाळेतील सर्व शिक्षिका उपस्थित होते.या कार्यशाळेसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयामधील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.