कांग्रेसची फसवणूक नव्हे,सोडवणुक करून घेतली

47

कांग्रेस ने सुधीर तांबे यांना शिक्षक मतदारसंघात उमेदवारी दिली.तांबेंनी कल पाहून पलटी मारली.मुलाला भाजपची उमेदवारी मिळवली.झाले मनासारखे.कांग्रेसला फसवले का? नाही. स्वताची सुटका करून घेतली.कांग्रेस काय कारवाई करणार? पक्षातून हकालपट्टी करणार.तेच तर हवे आहे तांबेंना.थोरातांना.कांग्रेस पक्षातून हकालपट्टी सुद्धा गौरवास्पद बनली आहे.असे अनेक आमदार कांग्रेस मधून स्वताची हकालपट्टी ची वाट पाहात आहेत.घर फिरले.वासे फिरले.फासे फिरले.

महाराष्ट्र राज्यात काँग्रेसचा एकही जिल्हा अध्यक्ष काम करताना दिसत नाहीत.आमचे जळगाव जिल्हा अध्यक्ष काहीच कामाचे नाहीत.शिंगांना हिंगूळ लावून मिरवणूक काढण्यापुरते पदाधिकारी नाना पटोलेंनी नेमलेले आहेत.त्यामुळे कोणत्याही विषयावर कोणत्याही जिल्ह्यात धोरणात्मक काम नाही.त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते शिथील,आळसी झाले आहेत.ढेपाळले आहेत.महत्वाकांक्षी काही असतील ते अस्वस्थ झाले आहेत.ते भाजपचे शिकार होत आहेत.आमदार असलो तरी , खासदार असलो तरी बसून बसून काय करणार?फक्त डीपीडीसी आणि विधानसभेत बसून खूर्ची तोडणे इतकेच काम उरते.शिवाय अधिकतम पदाधिकारी हे कांग्रेस ची तिसरी पिढी आहे. दुसरी पिढी सरासरी पेक्षा ६२.५ टक्के सक्षम असते.तिसरी पिढी सरासरी पेक्षा ३२ टक्के सक्षम असते.

चौथी तर त्याहुनि कमी.अशा अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना घेऊन कांग्रेस कसा काय भाजप चा मुकाबला करू शकते? शिवाय नेत्यांची दुसरी तिसरी पिढी लक्झरीयस लाईफ जगते.हॉटेल,दारु,मटण, मैत्रीणीची सवय असते.त्यामुळे बराच वेळ यात जातो.असे पदाधिकारी मोदी योगी यांची बरोबरी करू शकणार नाही.कसे शक्य आहे? एकिकडे योगी आणि दुसरीकडे भोगी.थोरात हे इतके जुने, म्हातारे नेते आहेत कि,त्यांना नवीन काहीच कळत नाही.ते प्रदेश अध्यक्ष असतांना एकही नवीन माणूस जोडला नाही.आम्ही जळगाव जागृत जनमंच ने त्यांचा संगमनेर हून मुंबई रस्त्यावर ४० किमी पाठलाग केला होता.रविवार होता.तरीही म्हणे मला मुंबईला महत्वाचे काम आहे.जे सोमवार ते शनिवार काम करीत नाहीत ते रविवारी कोणते काम करतील? काम धाम काही नाही फक्त पळवाट आहे.

नाना पटोले अंग्री यंग मॅन प्रदेश अध्यक्ष झाले.उंच पुरा,धट्टाकट्टा माणूस,रागट चेहरा,करारी आवाज .वाटले होते कि अब आयेगा मजा खेल का!पण दोन वर्षं संपले तरीही ते महाआघाडीच्या बैलगाडीच्या मागे बांधलेल्या म्हशीसारखे होते.रस्ता दिसत नाही.पण गाडी ओढते म्हणून चाचपडत चालावे लागते.कुठे नेत आहेत,कुठे जात आहोत,ते नाना पटोलेंना माहिती नाही.सरकारमधे होते तरी तितकेच किमी आणि सरकार पडले तरी तितकेच.पंडित नेहरू म्हणत,आराम हराम है!आता हे म्हणतात,आराम और हराम है!

एसटी कर्मचाऱ्यांचा मुंबईत आझाद मैदानावर संप चालू होता.म्हणे सरकारीकरण करा.मला वाटले भाजप खाजगीकरण करते.आणि कांग्रेस सरकारीकरण करते किंवा खाजगीकरण करू देत नाही.म्हणून आम्ही मुंबईत त्यांचे बंगल्यावर दहा तास वाट पाहत रात्री ९ वाजता भेट घेतली.पत्र दिले.सांगितले कि तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडा.महामंडळ शासनात विलीनीकरण ची मागणी करा. मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र देऊन दडपण टाका.त्यांना सत्ता हवी आहे आणि तुम्हाला यश.हो तर म्हटले पण पटोलेंनी काहीच केले नाही.एक तर स्वताला काही सुचत नाही आणि कोणी सुचवले तरीही पल्ले पडत नाही.तर कसा चालणार पक्ष? आणि आता जानेवारी २०२३ एसटी कर्मचाऱ्यांचा पगारासाठी संप सुरू झाला तर नाना पटोले त्यांना जाऊन भेटले.म्हणाले, महामंडळाचे शासनात विलीनीकरण करा.

काय नानाभाऊ!हा इतका पोरखेळ? राजकीय पक्षाला निश्चित भुमिका असते.छापा कि काटा?पण तुम्ही छापा काटा सारखेच समजले.विचारवे,छापा कि काटा? तुम्ही म्हणता ,छापा आणि काटा दोन्हीही.काय अर्थ आहे याला ? कभी हां,कभी ना!कसा चालेल पक्ष?
फक्त विखे, रघुवंशी,पटेल, काशीराम,गावीत नव्हेत.असे अनेक कांग्रेस आमदार कुंपणावर बसून आहेत.आता तांबे.नंतर थोरात.देशमुख,चव्हाण, चौधरी, पाटील.कुंपनावर बसले आहेत.भाजपकडून बुलावा येण्याची वाट पाहात आहेत. भाजपकडे नेते आहेत.आमदार खासदार कार्यकर्ते कमी आहेत.ते रिक्त जागा भरून काढत आहेत.फडणवीस बोलले बरोबर! सक्षम माणसाला असे जास्त वेळ ताटकळत ठेवणे योग्य नाही.आणि इकडे कांग्रेस कडे ,सक्षम माणसाला प्रवेश नाही.नो एन्ट्री फॉर स्क्वॉलर एण्ड एफिसियंट्स!ओन्ली फॉर फुल एण्ड बुल !

पंजाब मधे सक्षम मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंगांचा बळी घेतला.आता राजस्थान चे अशोक गहलोतचा बळी घेण्याची तयारी.आता सिब्बल गमावले,आझाद गमावले.आधी पवार,ममता सोडले.तर मग,मागे उरले काय?जळगाव मधे अब्दुल सत्तार,अशोक चव्हाण,के सी पाडवी, नाना पटोले,थोरात, विनायकराव देशमुख आले.काय बदल झाला? तुटलेल्या खाटेवर बसून एकमेकांचे कौतुक करून गेले.कांग्रेसमधे नसलेली अशी किती माणसे कांग्रेस मधे आली? कांग्रेस सोडून गेलेली किती माणसे परत कांग्रेस मधे आली? एक ही नाही.उलट राधेश्याम चौधरी,डी जी पाटील असे मोहरे कांग्रेस सोडून गेले.मागे काय उरले?खंगाळ!काय उपयोग?ना बांधकामाला ! ना भरावाला!तरीही म्हणे,स्वबळावर सत्तेवर येऊ.कसे शक्य आहे?काही लोकांचा तर्क आहे कि, कांग्रेस पुर्ण धराशायी करण्याचा कांग्रेस नेत्यांचा आदेश आहे.आम्ही पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करीत आहोत.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव