दिंडोरी तालुक्यातील आंबेवणीत नागरिकांनी दिला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मजूर पक्षाच्या चळवळीला उजाळा

35

✒️नासिक प्रतिनिधी(विजय केदारे)

दिंडोरी(दि.21जानेवारी):-राहुल कस्तुरे (दिंडोरी)यास कडून
दिंडोरी तालुक्यातील आंबे वणीत नागरिकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मजूर पक्षाच्या चळवळीला उजाळा दिला.डॉ.बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात तळागाळातील कष्टकरी शेतकरी व दिन दलित समाजासाठी अत्यंत प्रभावशाली काम केले त्यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजदूर पक्षाचे चिन्ह माणूस हे होते माणसाला माणसाने माणसाप्रमाणे वागवावे यासाठी आयुष्यभर ते झटत राहिले कामाचे तास, महिलांना आरोग्य सुट्टी, तसेच बोनस अशा विविध परिवर्तनवादी कामांसाठी बाबासाहेबांचे उपकार आहे.

त्यांच्या मजूर पक्षाच्या प्रचार प्रसाराच्या निमित्ताने १७ जानेवारी १९३७ रोजी तात्कालीक मजूर पक्षाचे खासदार कर्मवीर भाऊराव गायकवाड यांच्यासोबत बाबासाहेबांनी आंबेवणी या छोट्याशा गावाला भेट दिली होती बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गावाला चळवळीचा ऐतिहासिक वारसा मिळाला आहे. वेगवेगळ्या पुस्तकातही त्याचा उल्लेख आढळतो तसेच चळवळीतील तत्कालीक पिढीतले असंख्य वृद्ध लोक आजही त्या ठिकाणी नतमस्तक होऊन पुढच्या पिढीला दिशादर्शन करतात प्रसंगी बाबासाहेब आंबेवणी येथे कालकथीत.

किसन शिवराम गांगुर्डे यांच्या घरी अल्प उपहारासाठी थांबले होते या घटनेला आज ८६ वर्ष पूर्ण होत आहे. बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्यासाठी हा दिवस वर्धापन दिन म्हणून साजरा व्हावा यासाठी आंबेवणी गावचे सर्व नागरिक एकत्र येऊन मोठ्या उत्साहात बाबासाहेबांना मानवंदना देऊन,त्रिसरण पंचशील घेऊन साजरा केला. याप्रसंगी बोध्दाचार्य आयु. प्रदीपजी गांगुर्डे यांनी बाबासाहेबांच्या दौऱ्यासंदर्भात माहिती देत जुन्या आठवणींना उजाळा दिला…

कार्यक्रमाचे नियोजन आंबेवणी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मा. प्रवीण (आण्णा) गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली आयु.बाळासाहेब गांगुर्डे, धनंजय गांगुर्डे, प्रकाश गांगुर्डे, शरद गांगुर्डे, सुनील गांगुर्डे, रमेश गांगुर्डे, विलास गांगुर्डे, सचिन गांगुर्डे, रमाकांत गांगुर्डे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, रविंद्र गांगुर्डे, सुनील गांगुर्डे,दादाबाबा गांगुर्डे, नितीन गांगुर्डे, सनी गांगुर्डे, रूपेश गांगुर्डे, आदेश गांगुर्डे, आकाश गांगुर्डे, जय गांगुर्डे, राहुल गांगुर्डे, आशिष गांगुर्डे , किरण गांगुर्डे, आदित्य गांगुर्डे, रोशन गांगुर्डे ,आदी. तसेच रमाई महीला मंडळाच्या सर्व महिला सदस्यांनी कार्यक्रम एकत्रितपणे यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले… याप्रसंगी बाबासाहेबांचा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश डोळ्यासमोर ठेवून नव्या पिढीला नवीन निर्धार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली….