वसंत कारखाण्यावर पोफाळी ग्रामपंचायतीचा 27 लाख रुपयाचा कर थकीत!….ग्रामपंचायत ने पाणी पुरवठा केला बंद

27

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 2 फेब्रुवारी):-तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना सुरु होण्याच्या अंतीम टफ्यात असतांना ग्रामपंचायत प्रशासनाने अगोदर 27 लाख रुपयाच्या जवळपास थकीत कर भरावा नंतरच नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येईल असे अंतीम सुचनापत्र देवुन सक्त वसुलीचे संकेत दिले असून कारखान्याचा पाणी पुरवठा ग्राम पंचायत ने बंद केला आहे यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.

उमरखेड तालुक्यातील भाडेतत्वावर गेलेल्या वसंत सहकारी साखर कारखाना चालू होण्याच्या तयारीत आहे. परंतु ग्राम पंचायतचा कर न भरल्याने पोफाळी ग्राम पंचायतने अद्याप नाहरकत प्रमाणपत्र दिले नाही. ग्राम पंचायत नाहरकत प्रमाणपत्र व कर न भरता कारखाना चालू केल्यास सक्त वसुलीचे पाऊले उचलली जातील असे अंतिम सूचना पत्र दि. 30 जानेवारी 2023 रोजी कारखान्याला देण्यात आले.

साखर कारखाना चालू करण्यासाठी ग्राम पंचायत नाहरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे असते. परंतु पोफाळी ग्राम पंचायत कर थकीत कारखान्याकडे असल्याने ग्राम पंचायतीने अद्याप ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही.

कारखान्याकडे मागिल कर 2304910 रुपये, चालू कर 267485 रुपये आणि व्याज 115245रुपये असे एकूण 2687640 रुपये कर थकबाकी असल्याने कारखाना चालू करावयाचा असल्यास अगोदर थकबाकी भरावी. अन्यथा सक्तवसुलीचे पाऊले उचलली जातील असे अंतिम सूचना पत्र कारखान्यास देण्यात आले आहे.

पुढील पंधरा वर्षासाठी भाडेतत्वावर गेलेल्या वसंत साखर कारखान्याचे दुरुस्तीचे काम अतिवेगाने चालू असुन कारखाना कोणत्याही क्षणी चालू होण्याच्या मार्गावर आहे.

कारखाना साईटवर मोठा पेंडाल टाकला असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऊसाची मोळी टाकून कारखाना चालू करण्यात येणार असल्याचे जनसामान्यांत चर्चा होत आहेत.

कोणत्याही क्षणी कारखाना चालू होण्याची वाट पाहत असलेल्या वसंत साखर कारखान्यांवर कर न भरल्याने पोफाळी ग्राम पंचायतीने सक्त वसुलीची पाऊले उचलली जातील असे अंतिम सूचना पत्र दिल्याने वसंत कारखान्यांवर नामुष्कीची वेळ आली. आता तरी कारखाना ग्राम पंचायत कर भरणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले

वसंत सहकारी साखर कारखान्यावर ग्रामपंचायतचे 27 लाख रुपये कर थकबाकी आहे अनेक वेळा लेखी पत्र व्यवहार केला आहे. परंतु त्यातील अजून पर्यत कारखान्याचे अवसायकाने एक रुपया भरलेला नाही त्यामुळे थकबाकीचा भरना करावा असे सूचना पत्र पोफळी ग्रामपंचायत च्या वतीने देण्यात आले असून वसंत कारखान्याचा ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा बंद केलेला आहे – रेखाताई क्षीरसागर (सरपंच पोफाळी ग्राम पंचायत)
—–
वसंत सहकारी साखर कारखान्याकडे पोफाळी ग्रामपंचायत ची 27 लाख रुपये कर थकबाकी आहे. त्यांनी आमच्यासोबत अनेक वेळा पत्र व्यवहारही केलेला आहे परंतु वसंत कारखान्याला एवढी रक्कम एकदाच भरणे शक्य नसल्यामुळे टप्प्याटप्प्याने पोफाळी ग्रामपंचायत चा कर भरण्यास तयार आहोत – योगेश गोतरकर (अवसायक -वसंत सहकारी साखर कारखाना पोफाळी)