फुले एज्युकेशन तर्फे सेवापूर्ती आणि समाजप्रबोधनामुळे संजय सावंत सर झाले सन्मानित

34

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.4फेब्रुवारी): – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन तर्फे सत्यशोधक समाज स्थापना दीन शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बंकटस्वामी विद्यालय खडकीघाटचे मुख्याध्यापक मा.श्री संजय सावंत सर यांचा सेवापुर्ती व शाळेच्या माध्यमातून दरवर्षी इयत्ता ९ वी च्या मुलाकडून सामाजिक परिवर्तनासाठी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, कर्मकांड यावर आधारित नाटक तयार करून ते आजबजूच्या सर्व गावात सादर करून मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन करून जनजागृती केली सोबत मुलांना अभ्यासासोबत कलेचे धडे दिले त्याबद्दल विदर्भ साहित्य परिषदेचे अध्यक्ष मा. सिद्धार्थ कुलकर्णी ,अभिनेत्री स्वप्ना दुर्वे,शुभांगी शिंदे,चित्रपट महामंडळाचे जेष्ठ पत्रकार राहुल खरात यांचे शुभहस्ते अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले फोटो फ्रेम ,शाल ,पुषगुच्छ देऊन सपत्नीक नफरवडी ग्रामपंचायत प्रांगणात दि.31 जानेवारी 2023 रोजी रात्री 8 वाजता सन्मानित केले.

यावेळी सरपंच नफरवाडी बंडू सवासे, उपसरपंच केशव तांबे, सर्व ग्रा.प.सदस्य,सुधीर घुमरे (जिल्हाउपाध्यक्ष भा.ज.प)
पद्माकर घुमरे (सरपंच पारगाव) बाबा तिपटे,सय्यद सर, घुमरे सर,नजान सर, सोनवणे सर,पाळवदे सर,बबलू घुमरे,ढेरे सर,प्रा.रावसाहेब भोसले सर, के.सी.चव्हाण सर,पत्रकार विजय जाधव, शहाजी जाधव, हुले,बप्पा हुले,प्रसाद घुमरे, इंजिनिअर सुधीर सोनवणे,चव्हाण सर , आणि पुणे एस.एस.सी.बोर्डाचे अधिकारी बाळासाहेब सावंत उपस्थित होते.

याप्रसंगी संजय सावंत सर यांच्या सेवापुर्ति निमित्त प्रदीप लोखंडे यांनी पत्रकार राहुल खरात मार्फत दिलेली *ग्यान की* पुस्तक संच रुपये ६२०० ची जि. प. प्रा.शाळा. नफरवाडी शाळेस सत्यशोधक रघुनाथ ढोक व अभिनेत्री स्वप्ना दुर्वे यांचे शुभहस्ते मुख्याध्यापक खंडागळे सर यांना भेट दिले.यावेळी अभिनेत्री स्वप्ना दुर्वे आणि शुभांगी शिंदे यांनी शालेय जीवनात विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांचे मोठे योगदान असते ते काम सावंत सर यांनी अविरत पने सेवा करीत समाज प्रबोधनासाठी मौलिक योगदान दिले म्हणूनच आज बीड ,पुणे परिसरातून आलेले मान्यवर,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत असे म्हंटले.

यावेळी खंडागळे सर म्हणाले की वाचन संस्कृती जोपासण्यासाठी व तळागाळातील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पंखात बळ निर्माण करण्यासाठी *ग्यांन की* पुस्तक संच ग्रामीण भागातील मुलांना मिळाला याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानत सावंत सर यांचेमुळे ही संधी उपलब्ध झाली म्हणून त्यांचे विशेष आभार मानले.
यावेळी सत्यशोधक ढोक म्हणाले की आपले जीवन सावंत सर यांनी मोठे त्यागमय जगले म्हणुच आम्हाला हा भव्य दिव्य नागरी सत्कार , त्यांची मिरवणूक पहाण्याचा दुर्मिळ योग आला. अशा महान व्यक्तीचा सन्मान करण्याची व आमच्या संस्थेने ग्रामीण हिरे शोधण्याची संधी दिली याबद्दल ही आभार व्यक्त केले.

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना सावंत सर यांनी आपण केलेल्या कार्याला उजाळा देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकास होण्यासाठी काय काय केले हे गावकऱ्यांना सागून विद्यार्थी शिक्षणाने मोठ्या विविध पदावर कसे जातील या साठी कायम काम केले म्हणून हा भव्य सोहळा घडला. या कामीं माझ्या आई वडिलांनी मला घडविले म्हणून हे कार्य घडले. तसेच त्यांनी जिद्दीने श्रम करा यश दारात उभे रहाते असा मंत्र देखील सर्वानाच दिला.या कार्यक्रमासाठी पत्रकार राहुल खरात व नफरवाडी ग्रामपंचायत यांचे मोठे योगदान लाभले.यावेळी मोठ्या संख्येनी माता ,भगिनी ,गावकरी, मुले उपस्थित होती.