घुग्घुस ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

34

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.20फेब्रुवारी):-येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात रविवार, १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. तसेच ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्यगीत गाण्यात आले. ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा जयघोष करण्यात आला.

घुग्घुस प्रयास सखी मंच अध्यक्षा सौ.किरण बोढे म्हनाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तारखेनुसार जयंती आहे. महाराष्ट्राचा ‘जाणता राजा’, अशी ओळख असणारे शिवराय हे पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, सिनू इसारप, साजन गोहने, अमोल थेरे, राजेश मोरपाका, बबलू सातपुते, संजय भोंगळे, चिन्नाजी नलभोगा, गणेश खुटेमाटे, तुलसीदास ढवस, हेमराज बोंबले, शरद गेडाम, नितीन काळे, सुरेंद्र भोंगळे, विनोद जंजर्ला, धनराज पारखी, गौरव ठाकरे, गणेश बोबडे, कोमल ठाकरे, श्रीकांत बहादूर, सुशील डांगे,घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, पुजा दुर्गम, वैशाली ढवस, पुष्पा रामटेके, अमीना बेगम, वंदना मुळेवार, निशा उरकुडे, सुनंदा लिहीतकर, प्रीती धोटे उपस्थित होते.