नागभिड पोलीसांनी पकडली अवैध दारू

29

🔸नविन ठाणेदार योगेश घारेनी पोलीस कर्मचाऱ्यांना लावले कामाला!

✒️नागभीड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नागभिड(दि.21 फेब्रुवारी):-नागभिड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राम मंदिर चौक ते टी पॉईंट चौकात गुप्त माहितीचे आधारावर पोलिसांनी सापाडा रचून गडचिरोली जिल्ह्यातील व्यक्तीस अटक करून सुटका करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर अनेक अवैध दारू विक्रेते आणि पुरवठादार निर्माण झाले. यानंतर दारू सुरु झाल्याने अवैध दारूचा पुरवठा करणारे यांनीच भाड्याने दारू दुकानें घेऊन जिल्ह्यात जुन्या दारू विक्रेत्याला माल देणे सुरु केले. काल दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता पोलीस स्टेशन चे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना मुखबीर खात्री खबर मिळाल्याने कथ्या रंगाची टी व्ही एस ज्युपिटर वाहन क्रमांक MH 34BX 8242 मोपेड वाहनातून दारूची अवैध वाहतूक करीत असताना टी पॉईंट येथे पकडून पोलीस स्टेशन नागभीड येथे आणण्यात आले.

त्यांचेजवळ सहा बॉक्स ज्याची किंमत चोवीस हजार रुपये आणि जप्त करण्यात आलेले वाहन पन्नास हजार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला तय तो अण्णा नामक अवैध दारू विक्रेत्याची दारू पोहचविण्याचे काम करीत असल्याचे समजते. नागभिड पोलीस स्टेशन येथे आपराध क्र 65/23अन्व्यये गुन्हा दाखल करून कलम 65 म दा का कायदया ने पोलीस निरीक्षक योगेश शशिकांत घारे यांचे मार्गदर्शनाखाली पो उप निरीक्षक बारासागडे पुढील तपास करीत आहे.