बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू व सुरक्षा वस्तू संच वाटप….

29

✒️सचिन सरताप (प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.21,फेब्रुवारी):- छोटी सी आशा बहुउद्देशिय सामाजिक संस्थे च्या प्रयत्नातून नोंदनिकृत बांधकाम कामगारांना दि 20/02/2023 रोजी अत्यावश्यक वस्तू संच व सुरक्षा वस्तू संच वाटप करण्यात आले यावेळी गरजू बांधकाम कामगार उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य शासनाची असंघटित बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून गरजू व असंघटित कामगारांसाठी सुरू असलेल्या योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या छोटी सी आशा बहुउद्देशिय सामाजिक संस्था कुळकजाई ता माण यांचेकडून सातारा येथे गुलमोहर मंगल कार्यालय येथे दिनांक 20/02/2023 रोजी या अत्यावश्यक वस्तू संच व सुरक्षा संच (किट) वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे या कामगारांचे आरोग्य तपासणी ही करण्यात आली.

संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. रेश्माताई सुर्यकांत कुंभार यांनी बांधकाम कामगारांना या योजनेविषयी ची माहिती सांगितली व किट मिळवून देण्यास प्रयत्न ही केले.वरील वस्तूंचे वाटप वेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ रेश्माताई सुर्यकांत कुंभार सौ कविता एकनाथ बनसोडे, श्री सुनील रमेश महामुनी. सौ सुभद्रा नवनाथ भोसले आदी उपस्थित होते.