सालोरी येथे मदर पोल्ट्री प्रशिक्षण कार्यशाळा

70

✒️वरोरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.24फेब्रुवारी):-मानव विकास कार्यक्रम सन 2021- 22 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मदर पोल्ट्री युनिट संबंधित कार्य करणाऱ्या महिलांना प्रशिक्षित करण्याकरिता सालोरी येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.सदर कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर मैंदळकर, सल्लागार मा. वी. म.चे प्रवीण बावणे, पुरवठेदार डॉ. राहुल विधाते, युनिट अध्यक्ष अनिता पाटील, सचिव वंदना वाढई, प्रेरक प्रिया मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यशाळेतील महिलांना मार्गदर्शन करताना डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी पक्षी (पोल्ट्री) रोग व त्यावरील औषध व उपाय, योजना या विषयावर सविस्तर माहिती दिली.तसेच डॉ. राहुल विधाते यांनी पक्षी संगोपन या विषयाची प्रशिक्षणार्थि ला मार्गदर्शन केले. प्रवीण बावणे यांनी पक्षाचे निगा कशाप्रकारे राखायची व त्यांची काळजी कशी घ्यायची यावर चर्चात्मक मार्गदर्शन केले. सदर संस्थेचा मुख्य उद्देश हा ग्रामीण भागातील होतकरू महिलांना आर्थिक आधार मिळावा व त्यांना रोजगार मिळावा व व्यवसायी व्हावे. सलोरी गावातील महिला तसेच आर. जी. बी. सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शितल बावणे तर आभार प्रदर्शन प्रिया मोरे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता महिलांनी अथक परिश्रम घेतले.