गेवराई : तलवाडा पोलीस स्टेशन येथे मागील वर्षापासुन पडलेला 1,57,256 रू दारुचा मुद्देमाल नष्ट

85

🔹सपोनि शंकर वाघमोडे यांची कामाला प्राधान्य देण्यारी एंट्री

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.25फेब्रुवारी):- तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन येथे मागील काही वर्षापासुन दारूबंदी मधील (15) गुन्ह्यातील एकूण 1,57,256/- रू किंमतीचा मुद्देमाल तलवाडा पोलीस स्टेशनचे सपोनि शंकर वाघमोडे यांनी नष्ट केला आहे. तलवाडा पोलिस स्टेशनला सपोनि वाघमोडे हे रूजू होताच.

अवैध धदेवाल्याचे मनात भितिची वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहव्यास मिळत आहे. पो.नि.आगळे (दारूबंदी) यांच्या उपस्थितीत समक्ष अनेक वर्षांपासून पोलिस स्टेशन मध्ये पडुन असलेला दारुचा मुद्देमाल नष्ट केला आहे. तसेच तलवाडा पोलीस स्टेशन येथे परिसरातील बिकट व्यवस्था झाली होती. कारवाई केलेले वाहन पार्किंग मध्ये व्यवस्थित लावण्यात आले नव्हते. आता व्यवस्थित लावण्यात आले आहे. तसेच पोलीस स्टेशनच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशनमध्ये कामानिमित येणाऱ्या नागरीकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तलवाडा पोलीस स्टेशन येथे सपोनि शंकर वाघमोडे रूजू झाल्यापासुन तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये कामाला प्रधान्य देणारे आधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाल्याचे चित्र पाहव्यास मिळत आहे. सर्व सामान्य नागरीकातून त्यांच्या कामाचे कौतूक होत आहे.