भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय पदाधिकारी यांचा सन्मान

31

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.19मार्च);- शून्य से शिखर फौंडेशनच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त जनसेवेबद्दल समाजातील विविध मान्यवर व त्यांचे जोडीदार यांचा संयुक्त सन्मान आद.डॉ भीमराव य आंबेडकर आणि आद. मनीषा ताई आंबेडकर यांच्या हस्ते डॉ आंबेडकर भवन ,दादर येथे करण्यात आला.

त्यामध्ये दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे कॅप्टन प्रविण निखाडे (ट्रस्टी व आंतरराष्ट्रीय सचिव ) , एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्टाफ ऑफिसर ,समता सैनिक दल ), सुषमाताई पवार (राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय महिला विभाग प्रमुख ),बी एच गायकवाड (राष्ट्रीय सचिव ) यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी पोलीस दलातील 26/11 च्या आतंकवादी हल्यातील कसाबशी प्रत्यक्ष सामना केलेल्या पोलीस दलातील अधिकारी , मध्यप्रदेश , हैदराबाद , पंजाब व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील आणि मुंबई सिनेसृष्टीतील प्रसिध्द गायक सुदेश भोसले इत्यादी अनेक मान्यवर, महिला ,मुले यांचा सन्मान डॉ भीमराव आंबेडकर व मनीषाताई आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम शून्य ते शिखर फौंडेशन च्या संस्थापक संचालिका डॉ चंद्रकला सिंह (नोबेल प्राईज नॉमिनेटेड ) यांनी केला होता.