चौसाळा येथील चंदन शहावली याञेस मोठया संख्येने उपस्थित रहावे–विवेक कुचेकर

26

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.23मार्च):-तालुक्यातील चौसाळा येथील हिंदू मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या चंदन शहावली बाबा या देवस्थान याञेस प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी मोठया उत्साहात दिनांक २३ मार्च २०२३ पासुन प्रारंभ होत आहे याञेनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी चौसाळा व पंचक्रोशीतील जनतेने मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन हजरत चदंन शहावली याञा कमिटी उपाध्यक्ष विवेक कुचेकर यांनी केले आहे.

दिनांक २३ मार्च 2023 रोजी राञी संदलचा कार्यक्रम व ब्रॉस बॅण्डचा मुकाबला होणार आहे तर दिनांक २४ मार्च २०२३ रोजी राञी सांस्कृतिक,सोगांच्या गाडया व शोभेच्या दारूचा कार्यक्रम होणार आहे तर तिसरया दिवशी दिनांक २५ रोजी कुस्तयांची दंगल आयोजन केले आहे तर राञी रफीक कादरी विरुद्ध परवीन तबसुम यांचा कवालीचा कार्यक्रम होणार आहे तर रविवार दिनांक २६ मार्च २०२३ रोजी राञी ८ ते ११या वेळेत शिवचरिञकार गीतांजलीताई झेंडे (कुलकर्णी)यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी चौसाळा व पंचक्रोशीतील जनतेने या भरघोस कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन हजरत चदंन शहावली याञा कमिटी उपाध्यक्ष विवेक कुचेकर यांच्यासह सर्व कमिटी व चौसाळाकर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.