भविष्यातील प्रत्येक निवडणूक जिंकायचीच आहे, त्यामुळे आपण बेसावध राहून चालणार नाही

33

🔹शक्ती केंद्रप्रमुख आणि विस्तारकांच्या संघटनात्मक बैठकीत प्रा.अतुलभाऊ देशकर यांचे प्रतिपादन

🔸डोरलीचे सुरेश राऊत यांचा भाजपा पक्षात प्रवेश

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 26 मार्च):-भारतीय जनता पार्टीची शक्ती केंद्रप्रमुख आणि विस्तारकांची संघटनात्मक बैठक आवळगांव येथील त्रिवेणी संगमावरील श्री. गुरुबाबा देवस्थान सभागृहामध्ये दि. 26 मार्च 2023 रोज रविवारला दुपारी 12 वा. ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांचे अध्यक्षतेखाली तर डॉ.गोकुल बालपांडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा चंद्रपूर, प्राचार्य अरुण शेंडे तालुका अध्यक्ष भाजपा ब्रह्मपुरी,जिल्हा सचिव माणिक पा. थेरकर, जिल्हा उपाध्यक्षा भाजपा महिला आघाडी सौ. वंदनाताई शेंडे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष प्रा.रामलाल दोनाडकर, माजी जि.प. सदस्य शंकरदादा सातपुते, आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश्वर मगरे, माजी जि.प. सदस्य काशिनाथ पा. थेरकर,अनुसूचित जाती आघाडीचे रामभाऊ निहाटे, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष विलास वाकुडकर, शहर महामंत्री तथा नगरसेवक मनोज वटे, भाजयुमो जिल्हा सचिव तनय देशकर, यशवंत आंबोरकर माजी सरपंच, अनिल तिजारे सरपंच, गोपाल ठाकरे उपसरपंच, इ.मान्यवरांसह सर्वच शक्ती केंद्रप्रमुख आणि विस्तारक उपस्थित होते.

यावेळी तालुकाध्यक्ष अरुण शेंडे यांनी शक्ति केंद्रप्रमुख आणि विस्तारकांनी करावयाची कामे विस्तृतपणे विशद करून ठराविक वेळेत कार्य पूर्ण करून सहकार्य करावे,असे आवाहन केले. तर डॉ.गोकुल बालपांडे यांनी देशातील राजकीय घडामोडी आणि भाजपाची यशस्वी वाटचाल यावर प्रकाश टाकून शक्ती केंद्रप्रमुख आणि विस्तारकांच्या कार्यामुळे भविष्यात भाजपा ही कशी प्रभावशाली राजकीय पार्टी असेल हे विशद केले.

यावेळी डोर्ली गावचे प्रतिष्ठित नागरिक तथा श्री.गुरुबाबा देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष श्री सुरेशजी राऊत यांनी काँग्रेसला राम राम करून भारतीय जनता पार्टीच्या तसेच अतुल भाऊंच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केला.अतुल भाऊंनी भाजपाचा दुपट्टा घालून भाजपामध्ये प्रवेश करून घेतला असल्याची जाहीर केले.

अध्यक्षीय भाषणातून संबोधित करताना प्रा. अतुल भाऊ देशकर म्हणाले की, हे वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे. या वर्षात जिल्हा परिषद,पंचायत समिती बाजार समिती यांचेसह भविष्यात लोकसभा, विधानसभा अशा विविध निवडणुकांना सामोरे जायचे आहे. विरोधक मजबूत फळी बनवून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्या़ंच्या फळीचा भेद करून निवडणुका जिंकायच्याच आहेत. तेव्हा शक्ति केंद्रप्रमुख आणि विस्तारकांनी समर्पित भावनेने कार्य करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा मार्गदर्शन प्राचार्य अरुण शेंडे सर यांनी केले तर संचालन आणि आभार रामलाल दोनाडकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री देवनाथजी लोळे, पिंटू भाऊ आंबोरकर,रमेश चिलबुले,केवळराम नरुले,माणिक मोहुर्ले,अमोल भोयर,वामन बारसागडे, गणेश चौधरी,दिवाकर चौधरी, मोतीलालजी झरकर यांनी परिश्रम घेतले.