जुनी पेन्शन योजना नाकारल्याने भाजपचा पराभव-आमदार सुधाकर अडबाले

34

🔹BJP’s defeat by rejecting old pension scheme

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.13मे):-जुनी पेन्शन योजना हा शासकीय कर्मचाऱ्यांना government employees हक्क आहे. परंतु, कर्नाटक राज्यातील भाजप सरकारने तेथील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास स्पष्ट नकार दिला होता. यामुळे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक अशा सर्वांमध्येच नाराजी होती. विधानसभेच्या निवडणुकीत या सर्व जनतेने मतदानाच्या रुपात आपली नाराजी व्यक्त केली आहे. जुनी पेन्शन योजना नाकारल्याने भाजपचा पराभव झाला आहे.

महाराष्ट्र सरकारसुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्यास चालढकल करीत आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी आपली नाराजी मतदानातून दर्शवित शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेतून बाहेर खेचतील, अशी प्रतिक्रिया नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी दिली आहे. ———- —————- —————
BJP’s defeat by rejecting old pension scheme

Chandrapur- Old age pension scheme is entitled to government employees. However, the BJP government in Karnataka had explicitly refused to implement the old age pension scheme for government employees. This caused displeasure among the employees, their families and relatives. In the Assembly elections, all these people have expressed their dissatisfaction in the form of voting.

The BJP has been defeated by rejecting the old pension scheme. The Maharashtra government is also moving to implement the old age pension scheme. Therefore, the government employees in Maharashtra will vote to oust the Shinde-Fadnavis government in the upcoming elections, said Sudhakar Adbale, MLA from Nagpur Division Teachers Constituency.