वाडे येथे सत्यशोधक समाज संघाचे सांस्कृतिक प्रबोधन शिबीर संपन्न

42

🔹कृषी संस्कृतीचे संवर्धन करणे काळाची गरज – डॉ. सुरेश झाल्टे

✒️विशेष प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

वाडे ता.भडगाव सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण वर्ष व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वाडे ता.भडगाव येथील माळी समाज मंगलकार्यालय येथे दि. ४ जून २०२३ रोजी सकाळी ९ सत्यशोधक समाज संघाचे सांस्कृतिक प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम खंडेरायाची तळी भरून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

या प्रबोधन शिबिराचा विषय – तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले निर्मित सत्यशोधक समाज व भारतीय मूळ कृषी संस्कृती आणि या प्रबोधन शिबीराचे प्रमुख वक्ते वैद्य सुरेश झाल्टे (संयोजक – सत्यशोधक समाज संघ, महाराष्ट्र राज्य) होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक वाडे येथील सरपंच सौ. रजुबाई यशवंत पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

सत्यशोधक समाज संघ पुरस्कृत विधिकर्ते ह.भ.प.भगवान शा. रोकडे, माजी सरपंच देवीदास सहादू महाजन वाडे, माजी सरपंच यशवंत बंकट पाटील, राहूल भरत मोरे, भावलाल कन्हीराम परदेशी, ह.भ.प.शिवाजी महाराज चित्ते, भगवान रामचंद्र माळी छत्रपती संभाजीनगर येथून मुख्याध्यापक विजय धर्मा महाजन, एकनाथ देवराम महाजन, संजय दामोदर माळी, लक्ष्मण ओंकार चौधरी, अनिल बागुल, युवराज गंगाराम माळी, सुरेश तुळशीराम महाजन, अभिमन परशराम महाजन, प्रा.शंकर हिलाल महाजन, या कार्यक्रमासाठी  विशेष सहकार्य माजी मुख्याध्यापक पी. आर.( बापू ) महाजन, संत सावता माळी समाज पंच मंडळ मंगल वाडे यांनी केली.

भारत देशाच्या कृषी संस्कृतीची व या संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या गणमाता, कुळदेवी, सम्राट बळीराजा, खंडोबा, महासुभा (म्हसोबा ), भैरोबा, जोतीबा, प्रल्हाद, विरोचन, हिरण्यकश्यपू ई. महानायक व महानयिका यांची सांगड संत कबीर, संत तुकोबाराय, शिवराय यांच्याशी घालण्याचे महान कार्य तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी केले व हेच कार्य पुढे राजर्षी शाहू व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. या संदर्भातली सांस्कृतिक माहिती डॉ.सुरेश झाल्टे यांनी आपल्या मनोगतात दिली. या सांस्कृतिक प्रबोधन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. शंकरराव महाजन यांनी केले.