17 जून रोजी भारत जोडो अभियान महाराष्ट्रची बैठक आयोजित

58

✒️नागपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नागपूर(दि.15जुन):-भारत जोडो अभियानची विदर्भस्तरीय बैठक दिनांक 17 जून रोजी नागपूरात आयोजित केलीआहे. दिनांक 17 जून रोजी सकाळी 10.30 वाजता यशोदा हायस्कूल, त्रिमूर्ती नगर, गजानन महाराज मंदीर जवळ, नागपूर येथे आयोजित बैठकीत भारत जोडो अभियान महाराष्ट्रची ओळख, भविष्यातील रणनीती, सामान्य नागरिकांना समस्येची जाणीव आदी विविध विषयांवर चर्चा होणार आहे. वर्तमान परिस्थिती पाहता बैठक होणे महत्वाचे आहे. लोकांचे जगण्याचे प्रश्न कठीण होत चालले आहेत. महांगाई वाढत चालली आहे.

पेटोल, डिजलाच्या किमंती वाढल्या आहेत. जल, जंगल, जमीनीचे प्रश्न आवासून उभे ठाकले आहेत. लोकशाही संकोच पावत चालली की काय? असे वातावरण निर्माण होत आहे. महाराष्ट्र मध्ये दंगली घडत आहेत. सांप्रदायिक वातावरण निर्माण झाले आहे. दलीत -आदिवासी व महिलांचे प्रश्न भयानक रुप धारण करित आहेत. राजकीय घडामोडी पेचीदया होत आहेत. लोकांच्या प्रश्रावर सरकार गंभीर दिसत नाही. आणि 2024 च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका जवळ येत आहेत. त्या निमित्ताने सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांनी चर्चा करुन काही भुमिका घेणे गरजेचे आहे.

बुद्धीजीवी, लेखक व विचारवंतानी आपले मत मोकळे करुन भुमिका मांडल्या पाहिजेत. लोकशाही जींवत ठेवली पाहिजे. म्हणून बैठकीचे आयोजन आहे, या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रफुल्ल गुळदे, नुतन माळवी, प्रभू राजगडकर, दिनानाथ वाघमारे,विलास भोंगाडे यांनी केले आहे. भारत जोडो अभियान व 17 जून रोजी आयोजित केलेल्या बैठकीबाबत सविस्तर माहिती करीता 98903 36873 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.