“राष्ट्रपुरुष” राजर्षी शाहू महाराज यांची जयंती हर्शोलासात साजरी

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.28जून):- सामाजिक समरसता मंच चंद्रपूर व सेवादल वस्तीगृह चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती हर्शोलासात साजरी करण्यात आली. 26 जून हा शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्र शासनाने 2006 पासून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाडगे घराण्यात कोल्हापूर येथे झाला.

कार्यक्रमाला डॉ नंदकिशोर मैंदळकर सामाजिक समरसता मंच संयोजक चंद्रपूर, सुदर्शन नैताम,सुभाष नरुले, नितीन चांदेकर, सचिन बरबटकर, गंगाधर गुरूनुले, कोमल आक्केवर,प्रदीप गोविंदवार,राजाभाऊ पेटकर,प्रशांत निब्राड, विनोद करमरकर, पिंटू मुन, गणेश कन्नाके, गौरव आक्केवार, मनोज ताटे, स्वप्निल गावंडे, स्वप्निल सूत्रपवार, मोहन जिवतोडे, वसंत भलमे आदी उपस्थित होते. शाहू महाराजांची समाजातील शोषित वंचित घटकाबद्दल आस्था होती त्यांनी सर्व घटकांना एकत्र आणण्याचे काम केले.

समाजात सामाजिक समरसता यावी याकरिता समाजातील सर्व घटकांसाठी एक गाव एक स्मशान एक पाणवठा हवा जेणेकरून समाजातील सर्व घटकांचे एकत्रिकरण होऊन सर्व समाज आनंदीत राहतील आनंदाने वागतील भारतीय संविधानाला अपेक्षित समाजातील न्याय समताधिष्ठित बंधुभाव पूर्ण समाज निर्मिती उद्देश. वंचित घटकाचे सामाजिक न्याय हक्काचे प्रश्न सामाजिक अन्याय अत्याचाराच्या व तणावाच्या घटना विविध समस्या व त्यांचे निराकरण होणे गरजेचे आहे. आरक्षण देणारा पहिला राजा छत्रपती शाहू महाराज होते.

त्यांनी बाबासाहेब आंबेडकर या चकाकणाऱ्या हिऱ्याला त्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करून विदेशी शिक्षणाची संधी मिळवून दिले व त्यांना संपूर्ण सहकार्य करून विश्वरत्न घडविले. तसेच त्यांना कला, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा म्हणून संबोधल्या जाते तसेच त्यांनी अस्पृश्य व वंचितांसाठी वस्तीगृह स्थापन केले. अशा प्रकारे सर्व समाज घटकांना समरसता पूर्ण वातावर निर्माण केले अशा ह्या महान लोकराज्याची जयंती सामाजिक न्यायदिन म्हणून साजरा होतो. त्यांना सामाजिक समरसता मंच चंद्रपूर तर्फे विनम्र अभिवादन.