मुक्तीभूमी वाचनालय व अभ्यासिकेत मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासाच्या सुविधा हा आदर्श उपक्रम : रतन बनसोडे

79

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.7ऑगस्ट):-येवला तालुक्यातील ग्रामीण,कष्टकरी,शेतकरी शेतमजुरांच्या मुलांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका,येवला यांच्यावतीने सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा करता बहुमोल आशा ग्रंथ- पुस्तकांची सुविधा विनाशुल्क देते हा उपक्रम आदर्शवत असून तळागाळातील सर्व समाज घटकातील मुलामुलींनी ह्या अभ्यासिकेचा सदुपयोग करून आपला उद्धार करून घ्यावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य चिटणीस माजी सनदी अधिकारी रतन बनसोडे यांनी केले.

येथील मुक्तीभूमी वाचनालय व अभ्यासिका यांस त्यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.ऐतिहासिक येवला भूमी हि मानवी जीवनाला मुक्तीची वाट दाखवणारी भूमी असून विध्याभ्यासातूनच मानवी उद्धार व मुक्तीचा मार्ग मिळू शकेल असे उद्गार यावेळी बोलताना बनसोडे यांनी काढले.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय/राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन राजरत्न वाहुळ यांनी मानले.आभार सुरेश खळे यांनी मानले.

या वेळी माजी सनदी अधिकारी आशाताई गायकवाड (मंत्रालय मुंबई) सामाजिक कार्यकर्ते रमेश बनसोडे,वाचनालयाचे उपाध्यक्ष सुरेश खळे,अभिमन्यु शिरसाठ,एम.जानराव,शैलेंद्र वाघ,आदित्य जाधव,सुमित गरुड,समाधान निकाळे,पवन दळे सह विध्यार्थी व मान्यवर उपस्थित होते