वि.दा.सावरकर संस्थेतर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार

99

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनीधी)

गंगाखेड(दि.7सप्टेंबर):-शहरातील कराड इंटरनॅशनल स्कूल येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सार्वजनिक वाचनालय आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने (दि.5 सप्टेंबर मंगळवार) रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती साजरी करून शिक्षक दिना निमित्त शिक्षकांचा सत्कार कराड इंटरनॅशनल स्कूल व गोकुळ चिंतामणी सेमी इंग्लिश बालक मंदिर येथे साजरा करण्यात आला.

तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून जवळपास एकशे वीस शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते संजय सुपेकर, गोरक्षण संस्थेचे लक्ष्मीकांत जबदे,भारतीय जनता पार्टी सरचिटणीस रवी जोशी,संत जनाबाई शिक्षण संस्थेचे संचालक नागेश केरकर आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रूपालीताई जोशी, संचालक देवानंद जोशी व सर्व शिक्षक वृंदानी परिश्रम घेतले