सनातनी धर्माचा पापुद्रा हटवू पाहणारे!

103

(पेरियार ई.व्ही.रामसामी जयंती विशेष)

पेरियार हे दक्षिणेतील महात्मा जोतिबा फुले होते. म्हणून समस्त स्त्रियांना आवाहन करावेसे वाटते, की तुमच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या रामसामी पेरियार सारख्या महापुरुषांचा तुम्ही सत्कार व सन्मान करणार आहात कि नाही? अशा एका नास्तिकाविषयीची माहिती ‘बापू’- श्रीकृष्णदास निरंकारीजीं देत आहेत… 

आपल्या डोळ्यावरील सनातनी धर्माचा पापुद्रा हटविल्याशिवाय तुम्हाला ते शक्यही नाही. त्यांचे पूर्णनाव पेरियार इरोड वेंकट नायकर रामसामी होते. ते विज्ञान बोध आणि तर्क विषयाचे क्रांतीकारी विचारक होते. त्यांचा जन्म दि.१७ सप्टेंबर १८७९ रोजी झाला. त्यांनी समाजातील अस्पृश्य, पीडित, व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा व समान अधिकार मिळाविण्याचा मार्ग दाखवला. पेरियार एकमेव असे क्रांतीकारक होते की त्यांनी दक्षिण भारतातील राजकारणामधून ब्राह्मणवादाला सुरूंग लावला आणि समाज व्यवस्था बळकट केली तसेच तमिळनाडूच्या राजकारणात ब्राह्मणेत्तर समाजाला वर्तमान इतिहासातील राजकारणात बरोबरीने बसवले. तामिळनाडू राज्यात आज पण पेरियार रामसामी यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. पेरियार यांनी तत्कालीन मद्रास प्रांतात जस्टीस पार्टीची स्थापना केली.

पेरियार रामसामी यांनी तमिळनाडूतील ब्राम्हणेत्तर समाजात समाजजागृती कशी केली? ब्राह्मणेत्तर समाजाची जागृती करण्यासाठी ते गळ्यात ढोल अडकवून ढोलाच्या दोन्ही बाजूला देवीदेवतांची चित्रे चिकटवायाचे. त्या फोटोंना पायातील बूट व चप्पलांनी बडवायचे. ते असे यासाठी करत, की आपल्या बहुजन समाजावर त्यांचा फार मोठा पगडा आहे. ब्राह्मणांनी बहुजनांच्या मनात त्यांची फार मोठी भीती निर्माण केली, हा खरा दहशतवाद आहे आणि हा त्यांनी जाणीवपूर्वक निर्माण केलेला आहे. जर देवाला मानले नाही. त्याची पूजा केली नाही, नवस फेडला नाही, नारळ फोडला नाही, उदबत्ती लावली नाही आणि पाया पडले नाही तर देव कोपतो, रागावतो, शाप देतो. मग आपले वाटोळे होते, सत्यानाश होतो, आपत्ती कोसळते किंवा संकट येते. अशा त्यांनी थापा मारल्या आणि त्या आपल्या अज्ञानी लोकांना खऱ्या वाटल्या. असे रामसामींचे मत होते. त्यानंतर ते देवी-देवतांना हातगाड्यांवर ठेवायचे. तो हातगाडा चेन्नईच्या चौकात आणून त्यातील एकेकास पायातील पायातानाने बडवायचे.

बडवतांना लोकांना सांगायचे “हा तुमचा देव, मी याला चपलेने बडवतो आहे. तो स्वतःला वाचवू शकत नाही. तर मग तुम्हाला कसे वाचवू शकेल?” हे देवी-देवता आपले रक्षण करतील, वाचवतील, मदतीला धावून येतील अशा भ्रामक कल्पनेतून बहुजनांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी असे समाजजागृतीचे शस्त्र उपसले. ते आपल्या भाषणात लोकांना विचारायचे “जर साप आणि ब्राम्हण एकाच वेळी दिसला तर तुम्ही कोणाला माराल?” लोक उत्तर द्यायचे “सापाला” त्यावर ते म्हणत “सापाला बिलकुल मारू नका.” तेव्हा लोक विचारायचे, “मग कोणाला मारायचे?” त्यावर ते सांगत, “सापाला सोडून द्या आणि ब्राह्मण ठेचून मारा.” लोक विचारायचे “का?” त्यावर ते सांगत “साप चावला तर तोच माणूस मारतो, मात्र ब्राम्हण डसला तर पिढ्या न पिढ्या बरबाद होतात.” पेरियार यांच्या मते पुराण हे पुरोहितवर्गाने निर्माण केलेली वर्णाश्रम व जातीव्यवस्था होय. ते भारतीय समाजावर लादण्याच्या व्यापक कार्यक्रमाचे प्रतिक आहे.

त्यामुळे ते याचा विरोध करत असत. ते रामाला स्त्रीवर अनन्वित अत्याचार करणारा नराधम मानत असत. त्याने सीतेच्या चारित्र्यावर लावलेला आरोप, सीतेला परत जंगलात सोडण्याचे त्याचे दुष्यकृत्य हे स्वतःच्या बुद्धीचा वापर करून विचार करण्यारास मुळीच पटणार नाही. त्याने लक्ष्मणाच्या हस्ते शूर्पणखेचा चेहरा विद्रुप केला व त्या रागातून रावणाने सीतेचे अपहरण केले. तिला परिपूर्ण आपल्या ताब्यात ठेवूनही त्याने तिच्या शरीराला स्पर्शही केला नाही. त्याचे हे स्त्री सन्मानाचे चारित्र्य व कृतीसत्य आजच्या भारतीय स्त्रियांना व तरुण वर्गास का उमगत नाही? तो इतका चारित्र्यसंपन्न असूनही भारतीय स्त्री त्याचा द्वेष व विरोध का करते? त्यामुळे तरुण व स्त्रिवर्गास विचारावेसे वाटते, की तुम्ही कधीपर्यंत पोथ्यातील खोट्या समजुतीमध्ये गुरफटून राहणार आहात? कधीपर्यंत रामाच्या दुष्कृत्याला पुण्यकर्म व रावणाच्या सत्कार्याला दुष्यकृत्य समजणार आहात?

सन १९०४मध्ये पेरियार यांनी काशीला भेट दिली. ज्याने त्यांचे आयुष्य फार बदलून गेले. भूख लागल्यावर ते तेथील नि:शुल्क भोजनाची व्यवस्था करण्यात आलेल्या कक्षात गेले. तेथे गेल्यावर त्यांना समजले, की ते भोजन फक्त ब्राह्मणांसाठी आहे. त्यांनी भोजन मिळविण्यासाठी खुप प्रयत्न केला. पण ब्राह्मणांनी त्यांना धक्के देवून बाहेर काढले, अपमानित केले. ज्यामुळे ते रूढीवादी हिंदुत्वाचे कट्टर विरोधी बनले. त्यानंतर त्यांनी कोणत्याही धर्माचा स्वीकार केला नाही, म्हणूनच ते आजीवन नास्तिक राहीले. केरळ आणि उर्वरित भारतातील प्रचलित जातीव्यवस्थेनुसार निम्न जातीच्या हिंदूंना मंदिरात प्रवेश नाकारला गेला. केरळमध्ये त्यांना मंदिरांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर चालण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्याकाळी काँग्रेस पक्षाच्या काकीनाडा बैठकीत के.के.माधवन यांनी केरळमधील निराश जातींमधील भेदभाव दर्शविणारा अहवाल सादर केला. त्या सत्राने अस्पृश्यतेविरूद्धच्या हालचालींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला.

केरळमध्ये या अस्पृश्यतेच्या विरोधात लढा देण्यासाठी वेगवेगळ्या जातींच्या लोकांची समिती बनविली गेली. के.केल्पन यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती; बाकीचे सदस्य टी.के.माधवन, वलयुधा मेनन, कुरुर नीलाकांतन नंबूदिरीपाद आणि टी.आर.कृष्णस्वामी अय्यर होते. या चळवळीस प्रारंभ झाला. वैकोम महादेव मंदिराच्या बाहेरील बाजूस एक बोर्ड होता ज्यामध्ये अवतार- निम्न जातींच्या लोकांना प्रवेश करण्यास मनाई होती. सत्याग्रही तिघांच्या तुकडीने मंदिरात प्रवेश करण्यासाठी गेले. पोलिसांनी त्यांचा प्रतिकार करत अटक केली. म.गांधीजी, चटंपी स्वामीकल आणि श्री नारायण गुरु यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. या चळवळीला अखिल भारतीयत्व प्राप्त झाले आणि दूरदूरवरून पाठिंबा मिळाला. सत्याग्रह्यांना अन्न पुरवण्यासाठी स्वयंपाकघर बसवून पंजाबचे अकाल लोक पाठिंबा देतात. ख्रिश्चन आणि मुस्लिम नेते देखील समर्थनासाठी पुढे आले. म.गांधीजींच्या सल्ल्यानुसार हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. जाती-हिंदूंशी चर्चा अयशस्वी झाल्यानंतर नेत्यांनी आंदोलन पुन्हा सुरू केले.

नेते टी.के.माधवन आणि के.पी.केसावा मेनन यांना अटक करण्यात आली. आपला पाठिंबा देण्यासाठी इ.व्ही.रामसामी पेरियार तामिळनाडूहून आले होते. त्यांना अटक करण्यात आली. म.गांधींनी गैर-केरळवादी आणि बिगर-हिंदूंनी भाग घेण्यास आक्षेप घेतल्यानंतरही पेरियार आणि त्यांचे अनुयायांनी आंदोलन मागे घेतले नाही. तोवर या आंदोलनाला पाठिंबा देत राहिले. सत्याग्रहात भाग घेतलेल्या त्यांच्या अनुयायांनी त्यांना ‘वैकोम वीरान’ ही पदवी दिली.

वैकोम सत्याग्रह ज्या प्रकारे नोंदविला गेला आहे, त्याद्वारे संबंधित आयोजकांच्या प्रतिमेस एक संकेत मिळतो. म.गांधी आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच ‘अ स्टडी इन लीडरशिप’ या शीर्षकाच्या लेखात एलेनोर झेलियट यांनी ‘वैकोम सत्याग्रह’ साकारला आहे. या घटनेसंदर्भात मंदिरातील अधिकाऱ्यांशी म.गांधींनी केलेल्या वाटाघाटीचा समावेश आहे. याव्यतिरिक्त हेतुपुरस्सर ई.वी.रामसामी यांच्या सहभागाविषयीच्या बातम्या दडपल्या गेल्या. यंग इंडिया या अग्रगण्य काँग्रेसच्या नियतकालिकात वायकॉमवरील आपल्या विस्तृत अहवालात त्यांचा उल्लेख कधीच आढळत नाही. महान समाजसुधारक पेरियार यांचे दि.२४ डिसेंबर १९७३ रोजी निर्वान झाले.

!! जयंतीनिमित्त त्यांच्या अविस्मरणीय स्मृतींना शतदा विनम्र अभिवादन !!


✒️’बापू’- श्रीकृष्णदास निरंकारी(मराठी साहित्यिक, विदर्भ प्रदेश)मु. पोटेगावरोड, पॉवर स्टेशनच्या मागे, गडचिरोली.
जि. गडचिरोली. मो.नं. ७७७५०४१०८६.