मराठवाडा मुक्ती संग्रामात दिन ध्वजारोहण व मा प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवसा निमित्त केक कापून विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा

78

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.17सप्टेंबर):-श्रीकृष्ण सभागृह कोरपना येथे मराठवाडा मुक्ती संग्रामात दिना निमित्त ध्वजारोहण व मा प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक मा ना हंसराजजी अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार होते तर अध्यक्ष स्थानी मा श्री खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर प्रमुख पाहुणे श्री मा संजय भाऊ धोटे माझी आमदार राजुरा,मा श्री देवरावभाऊ भोंगळे माझी जिल्हा अध्यक्ष तथा विधानसभा प्रमुख राजुरा,मा श्री सुदर्शनजी निमकर माझी आमदार राजुरा मा श्री अरुण भाऊ मस्की भाजपा जिल्हा सचिव,मा श्री राजुभाऊ घरोटे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष,श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, श्री सतीश भाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर,श्री किशोरभाऊ बावणे सहकार आघाडी प्रमुख,श्री शिवाजी भाऊ शेलोकर भाजपा जेष्ठ नेते,श्री महादेव भाऊ एकरे जेष्ठ नेते,श्री रामसेवक मोरे नगरसेवक, श्री निलेश भाऊ ताजने माझी नगरसेवक,श्री अरुण भाऊ मडावी माझी सरपंच,श्री पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष,श्री शशिकांत आडकिने,श्री विजय रणदिवे,श्री अमोल आसेकर माझी नगरसेवक सौ अल्काताई रणदिवे,सौ जयाताई धारणकर, इंदिरा ताई कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस ध्वजारोहण तसेच मा प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस केक कापून विद्यार्थ्यांना नोटबुक व जेष्ठ नागरिकांचा,उत्कृष्ट काम करणाऱ्या जवानांचा,महिला बचत गट,व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा सत्कार मा श्री हंसराजजी अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक,खाऊ वाटप करण्यात आले मा ना श्री हंसराजजी अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष यांनी प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून शालेय मुलांन सोबत मिळून केक कापून मुलांना केक भरऊन वाढदिवस साजरा केला मा ना श्री हंसराजजी अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसाचे महत्त्व सांगितले आपला देश 15 आगष्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला परंतु मराठवाडा हैदराबादच्या निजामाच्या गुलामगिरीत होता या चळवळीत अनेक शुरवीरांनी, स्वतंत्र सैनिकांनी लढा देत मोगलांचा पराभव केला व 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्ती झाला आपन 17 सप्टेंबर हा दिवस ध्वजारोहण करून साजरा करतो मा प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या 9वर्ष केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला भाजपा तालुका पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य भास्कर वडस्कर,जगदीश पीपंळकर,तिरुपती कन्नाके, प्रमोद कोडापे,नैनेश आत्राम,उमेश पेंदोर,मनोज तुमराम,सागर दुर्वे मिडीया ग्रामीण प्रमुख,धम्म किर्ती कापसे, साजिद उमरे,अभय डोहे आदी भाजपा पदाधिकारी,नगरसेवक, सरपंच,उपसरपंच,महिला,पुरुष विद्यार्थी, विद्यार्थिनीं, नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी केले तर आभार अमोल आसेकर यांनी मानले