नेपालचे जनकजी खडका कडून सुरज यादव सम्मानीत

288

✒️खामगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

खामगांव(दि.18सप्टेंबर):- येथील एकनिष्ठा रक्तदाता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत हातीगौडा रक्त संचार कोष ( नेपाल ) यांनी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात त्यांनी आपल्या भारत देशातील ठराविक संस्था नेमल्या होते जे रुग्णांचे जिव वाचविण्यासाठी दिवसरात्र झटत असतात खास हा सम्मान त्या सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी ठेवण्यात आला होता.

या कार्यक्रमात एकनिष्ठा गौ-सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष गौ-सेवक रक्तमित्र सुरज शिवमुरत यादव राहणार खामगांव जिल्हा बुलढाणा यांनी आता पर्यंत असंख्य गौ-वंश व रुग्णांना वेळेवर रक्त पुरवठा करून जिवन वाचविण्याचे पुण्य कार्य केलेले आहे त्यांचा सत्कार आपल्या भारत देशात येऊन नेपाली टोपी, रुद्राक्षमाळ घालून जनकजी खडका, राजु भंडारी हिंदुराष्ट्र नेपाल यांनी त्यांच्या परीवारासह सत्कार केले व तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या अशी माहिती गब्बू गुजरीवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.