बाळांचे निरोगी आणि सुदृढ आरोग्य हीच राष्ट्राची खरी संपत्ती

154

🔹माजी आमदार प्रा.अतुल भाऊ देशकर यांच्या हस्ते बेबी किटची वाटप

✒️रोशन मरनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.26सप्टेंबर):-भाजपा ब्रह्मपुरी तर्फे दि.
18 सप्टें. पासून 2 ऑक्टो. पर्यंत सेवा पंधरवडा, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येत आहे. दि. 25 सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे सायं.पाच वाजता नव मातांना “बेबी किट” वाटपाचा कार्यक्रम अतुलभाऊंच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाची वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्रीकांत कामडी तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. सुखदेवे मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते. बेबी किटचे वाटप करताना संवाद साधताना अतुलभाऊ म्हणाले की, नवजात बालकाचे आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहावे आणि ते भविष्याचे शिल्पकार व्हावे. या दृष्टिकोनातून ह्या बेबी किटचे वाटप करण्यात येत आहे.

यावेळी भाजपा जेष्ठ नेते प्रा.कादर शेख, तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे,शहराध्यक्ष इंजिनीयर अरविंद नंदुरकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रा.रामलाल दोनाडकर, प्राचार्य सुयोग बाळबुद्धे शहराध्यक्ष भाजयुमो,डॉ. प्रा.अशोक सालोटकर, शहराध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा, सौ वंदनाताई शेंडे जिल्हा उपाध्यक्षा भाजपा महिला मोर्चा, मंजिरी राजनकर,विक्रम कावळे शहर महामंत्री, राजू भागवत महामंत्री भाजपा ओबीसी मोर्चा,द्यानेश्वर पाटील दिवटे महामंत्री भाजपा प्रा.यशवंत आंबोरकर महामंत्री भाजयुमो ब्रह्मपुरी, इंजिनियर अविनाश मस्के महामंत्री भाजयुमो ब्रह्मपुरी, स्वप्निल अलगदेवे शहर महामंत्री भाजयुमो,अनिल तिजारे सरपंच, राजेश्वर मगरे तालुकाध्यक्ष भाजपा आदिवासी आघाडी ललीत उरकुडे,किशोर बावनकुळे, उत्तम उरकुडे, सुभाष सहारे अरुण भगत,सुरेश बनपुरकर इ.भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ता बंधू आणि भगिनी उपस्थित होते.