श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या चेअरमन पदी रणधीर जाधव यांची बिनविरोध निवड

71

✒️सातारा-खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

सातारा(दि.16ऑक्टोबर):- महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात अधिराज्यासह संपूर्ण देशात नावलौकिक असलेल्या पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या चेअरमन पदी रणधीर सुभाषराव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीनंतर बाळासाहेब उर्फ संतोष जाधव यांची चेअरमन पदासाठी निवड करण्यात आली होती, दीड वर्षाच्या कालावधीनंतर बाळासाहेब जाधव यांनी स्वेच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर चेअरमन पदाची खुर्ची रिक्त झाली होती, त्यानंतर रविवारी चेअरमन पदासाठी ट्रस्टच्या सभागृहात मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली.

चेअरमन पदासाठी रणधीर जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने, निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडीच्या झालेल्या बैठकीस विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, गौरव जाधव, सचिन देशमुख, सचिव विशाल माने उपस्थित होते. निवडीनंतर परमपूज्य सुंदरगिरी महाराज यांचे हस्ते स्वागत करून सत्कार करण्यात आला. व शुभेच्छा व्यक्त केल्या.