नारीशक्तीचा सन्मान होणे आवश्यक-साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल

104

✒️कुरखेडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कुरखेडा(दि.22ऑक्टोबर):-सध्या नवरात्र सुरु आहे व या नवरात्रीचे औचित्य साधून बऱ्याच ठिकाणी नारीशक्तींचे समाजासाठी असलेले कार्य पाहून त्यांचा सन्मान केला जात आहे. त्याप्रमाणेच अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरखेडा येथे वास्तव्यास असलेल्या नारीशक्ती पुष्पा सदाशिव बन्सोड यांनी पतीच्या निधनानंतरसुद्धा खचून न जाता अतिशय कठीण परिस्थितीत शिवणकामाचा व्यवसाय करून आपल्या पाचही मुलांना उच्च शिक्षण देऊन घडवले व समाजात एक वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण केली.

समाजासाठी त्या खऱ्या अर्थाने प्रेरणादायी नारी आहेत, अशा नारीशक्तीचा सन्मान व्हावा व त्यांची जगात ओळख व्हावी ह्या हेतूने कुरखेडा येतील सुप्रसिद्ध साहित्यीक, सामाजिक कार्यकर्त्यां संगीता संतोष ठलाल यांनी त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्यावर लेख लिहिले व तेवढ्या पुरतेच मर्यादित न ठेवता त्यांच्या दुकानात जाऊन शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळी नारीशक्ती पुष्पा गहिवरून गेल्या व व्यक्त होताना म्हटले की, आजपर्यंत मला कोणाचीही साथ मिळाली नाही, तरीपण मी हार न मानता संघर्षाच्या वाटेवरून चालत जगायला शिकली. बिकट परिस्थितीतही कोणत्याही महिलांनी हार मानू नये.

साहित्यिक संगीता ठलाल ह्या पहिल्या महिला आहेत की, त्यांनी एक महिला होण्याच्या नात्याने माझी भेट घेऊन माझ्यावर लेख लिहून आज माझा सत्कार केला. त्या जशा लिहितात तसेच कार्य करून दाखवतात. संगीता ठलाल यांच्या लिखाणाचे व त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांनी पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यावेळी संगीता ठलाल यांनी सुद्धा व्यक्त होताना म्हटले की, तळागाळात असलेल्या नारीशक्तींचा शोध घेऊन त्यांचे कार्य जाणून त्यांचा योग्य तो सन्मान करणे आवश्यक आहे. या शुभप्रसंगी ममता मेश्राम सीया ठलाल आदी उपस्थित होते. अशी माहिती आमच्या वृत्तकार्यालयास श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींनी अवगत करून दिली आहे.