कृष्ण गीता नगरमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त मतदार जनजागृती !….

93

🔸महिला सशक्तीकरण्यासाठी सदैव कटीबद्ध – ततहसिलदार महेंद्र सुर्यवंशी

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील)

धरणगांव(दि.22ऑक्टोबर):- येथील नगरपालिका हद्दीतील कृष्ण येथे “जागर स्त्री शक्तीचा – मतदान अधिकाराचा” नवरात्रोत्सवानिमित्त तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असतांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ पी डी पाटील यांनी नवीन मतदार यांची नोंदणी फॉर्म नंबर ६, फॉर्म नंबर ७, फॉर्म नंबर ८ विषयी विस्तृत अशी माहिती उपस्थित मतदारांना सांगत संविधानाने आपल्याला मताधिकार दिलेला आहे. तो हक्क आपण सर्वांनी अबाधीत ठेवावा असे श्री.पाटील सर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तहसिलदार महेंद्र सुर्यवंशी, लिपीक महेंद्र पवार, प्रभागातील बीएलओ सुनिल देशमुख यांसह असंख्य मतदार उपस्थित होते. तत्पूर्वी दुर्गामाता मित्र मंडळाच्या वतीने सर्व अतिथींचे शाल व महापुरुषांचे अनमोल ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले. तहसिलदार सुर्यवंशी यांनी प्रशासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. महिला सशक्तिकरण ही काळाची गरज आहे म्हणून महिलांनी जागृत होऊन मतदानाचा अधिकार बजावला पाहीजे तसेच मतदानाचे महत्त्व सांगुन सर्वांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करणे गरजेचे आहे यासाठी आमचे बीएलओ आपणास सहकार्य करतील. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये व सर्वांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन श्री.सुर्यवंशी यांनी केले.

याप्रसंगी कृष्ण गीता नगर कॉलनीचे अध्यक्ष बी एम सैंदाणे, उपाध्यक्ष विनायक न्हावी, सचिव महेंद्र सैनी, जे एस पवार, गोकुळ महाजन, प्रल्हाद विसपुते, बाळू अत्तरदे, ज्ञानेश्वर पवार, रवींद्र शिरसाट, जगन्नाथ भोई, विनोद सैनी, पंकज मिस्तरी, सुधाकर मोरे, सागर चौधरी, राजेंद्र चौधरी, ईश्वर बन्सी, साहेबराव मैराळे तसेच कृष्ण गीता नगर मधील बंधू – भगिनी, युवक – युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी.पाटील तर आभार एस.एन.कोळी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृष्ण गीता नगर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परीश्रम घेतले.