केंद्रप्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापकाची पदे त्वरित भरावी-पुरोगामी शिक्षक समितीचे शिक्षणाधिकाऱ्यांना स्मरण पत्र

170

🔸१५ दिवसात पदोन्नती प्रकरणे निकाली निघणार

✒️सुयोग डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चंद्रपूर(दि.22ऑक्टोबर):- जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत अंतर्गत 66 केंद्रप्रमुख आणि 55 उच्च श्रेणी मुख्याध्यापकाची पदे रिक्त असून मुख्याध्यापकाविना शाळा चालत आहेत .केंद्रप्रमुखाचा पदभार विषय शिक्षकाकडे देऊन जिल्हा परिषद काम चालवत आहे त्यामुळे संबंधित शिक्षकांचा वर्ग कोण सांभाळेल? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

या विषय संबंधाने जून महिन्यात शिक्षणाधिकाऱ्यांना तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा चंद्रपूरचे वतीने निवेदन देऊन सदर पदे पदोन्नतीने भरणे बाबत विनंती केली होती. दहा जुलैपर्यंत सदर पदावर पदोन्नती करण्यात येईल असे आश्वासन त्यावेळी संघटनेला देण्यात आले होते.

तीन महिनेचा कालावधी उलटूनही सदर मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखाची पदे भरली नाहीत ती त्वरित भरावे म्हणून दिनांक 20 ऑक्टोबर 2023 ला जिल्हास्तरीय समितीने जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांना तिसरे स्मरणपत्र दिले आणि चर्चा केली.

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकर सर्व संघटनांची सभा लावावी अशी विनंती करण्यात आली.पुढील १५ दिवसात पदोन्नती प्रकरणे निकाली काढण्यात येईल तसेच पटसंख्येनुसार शिक्षक असावे म्हणून समायोजन करण्यात येईल असे अवगत करण्यात आले.सदर शिष्टमंडळात जिल्हा अध्यक्ष किशोर आनंदवार, सरचिटणीस सुरेश गीलोरकर, महिला मंच जिल्हाध्यक्ष शालिनी खटी, उपाध्यक्ष शुभाष अडवे, जीवन भोयर व राज्य नेते विजय भोगेकर उपस्थित होते.