दुःख मुक्तीसाठी समुपदेशनाची आवश्यकता – बौद्धाचार्य भगवान बरडे

113

 

 

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

पुसद :- (दि. 23 नोव्हेंबर) प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने दुखी आहे. पिढीत आहे.आपले दुःख आपल्याला समजते पण स्वतःला त्या दुःख मुक्तीचा मार्ग काढता येत नाही जसे आपण बिमार पडल्यानंतर वैद्याकडे जाऊन आपले दुःख सांगतो त्यावर वैद्य औषधी देऊन आपले दुखणे औषध उपचाराने बरे करतो तसेच समाजामध्ये कुटुंबामध्ये नाना विविध दुःख पीडा आहेत .त्या आपणास समजल्या तरी त्यातून मार्ग काढता येत नाही.

जगामध्ये लाखो प्रकारचे दुःख आहे. त्या प्रत्येक दुःख सोडवण्याचा निश्चित असा कोणता ना कोणता मार्ग निश्चित आहे तो मार्ग सांगण्यासाठीच उपासक उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराची गरज आहे .हे केंद्रीय शिक्षिका समुपदेशनाच्या माध्यमातून बौद्ध धम्मात सुलभ असे सुख निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.

असे मत पुसद शहरातील सुभाष वार्ड येथील पंचशील ध्वजाजवळ भारतीय बौद्ध महासभा महिला वार्ड शाखा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दहा दिवसीय उपासक उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बौध्दाचार्य भगवान बरडे यांनी आपले मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रल्हाद खडसे तर प्रमुख पाहुणे शहराध्यक्ष ल.पू .कांबळे, प्रकाश भगत, किसन धुळे, रंगराव बनसोड, निर्मला सुर्यतळ,विनोद कांबळे, तसेच इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोलानाथ कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम चौरे यांनी केले तर आभार राहुल पडघणे यांनी मानले.

या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा ,समता सैनिक दल शाखेचे पदाधिकारी , सुभाष वार्ड व तेलगू वसाहत येथील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.