उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथे पती- पत्नी सह मुलावर प्राणघातक हल्ला आरोपीला अद्याप अटक नाही; बिटरगावच्या ठाणेदार बनसोड आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ? ठाणेदाराची भुमिका संशयास्पद

488

 

✒️सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि.23 नोव्हेंबर) तालुक्यातील सावळेश्वर येथे दिनांक २१ नोव्हेंबर रोजी दुपारी पती पत्नी सह ६ महिन्याच्या लहान बळावर जीव घेना हल्ला झाला असून फक्त गुन्हा नोंद करायला बीटरगाव पोलिस ठाणेदार यांना २४ तास लागले असून अश्या दिवसाढवळ्या हल्ल्या मुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चंद्रमणी काळबांडे व त्यांची पत्नी दोघे रा. सावळेश्वर यांच्यावर गावातीलच संदेश कांबळे नामक व्यक्ती ने स्प्रिंकल च्या लोखंडी पाईप ने डोळ्याच्या वर हातावर व पायावर सपासप वार केले तसेच पती ला सोडवताना पत्नी वर सुध्दा हल्ला चढवत लहान बाळाला ओढण्याचा प्रयत्न केला.

जखमी झालेल्या चंद्रमणी ला यवतमाळ शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले असून अद्याप आरोपीला अटक नसून आरोपी हा खुला फिरत असुन यामुळे पोलिस ठाणेदार सुजाता बनसोड यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.