ढाणकी येथे संविधान दिन तथा टिपू सुलतान जयंती निमित्त संविधान जागृतीवर भव्य प्रबोधन कार्यक्रम पार पडला

177

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

ढाणकी (दि. 23 नोव्हेंबर) भारत मुक्ती मोर्चा द्वारे ढाणकी येथे संविधान दिन तथा टिपू सुलतान जयंती निमित्त संविधान जागृतीवर भव्य प्रबोधन कार्यक्रम पार पडला.

आज देशातील धर्मांध संविधान विरोधी शक्ती ह्या भारतीय संविधानाला संपविण्याचे षडयंत्र करीत असून त्या विरोधात आम्ही भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने देशभरात संविधानिक मार्गाने राष्ट्रव्यापी लढा देत आहोत.”

“संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकांना कलम 19 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि संविधानाच्या विरोधात जाऊन तो कुणीही रोकु शकत नाही.
असे परखड मत भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय महासचिव ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा.डॉ.विलास खरात यांनी व्यक्त केले.

ते ढाणकी येथील संविधान दीन तथा मूलनिवासी नायक टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त 21 नोव्हेंबर रोजी आयोजित संविधान जागृती कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटक उत्तमराव सोनकांबळे निवृत्त सहसंचालक लेखा व कोषागारे विभाग यांनी
“भारत मुक्ती मोर्चा सारख्या संघटना संविधानाला आदर्श मानून काम करतात अशा वेळी आर्टिकल 19 चे प्रशासन हनन करत असेल तर त्यासाठी कायदेशीर मार्गाने राष्ट्रव्यापी लढा उभारला जाईल.

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिलेला आहे. त्याचे रक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

तसेच आज बहुजनांनी टिपू सुलतान यांचा मानवतेसाठीचा खरा इतिहास जाणून घ्यावा” असे प्रतिपादन त्यांनी उद्घाटकिय भाषणात केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून दिल्ली येथील वरिष्ठ वकील एड.सुनिल डोंगरदिवे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळू पाटील चंद्रे, माजी नगरउपाध्यक्ष शेख जाहीर भाई, बी.एम.पि च्या लोकसभा प्रभारी वर्षाताई शिवाजीराव देवसरकर, शेख खाजा भाई, लहूजी क्रांती मोर्चा च्या संगीता महागडे, हाजी बाबू भाई,एड. अन्सारजी, भारत मुक्ती मोर्चा चे किशोर नगारे, एड.राजरत्न येंगडे, चांद कशिष, अजिज खान पठाण,भास्करराव चंद्रे,सादिक भाई, कृष्णा पाटील चंद्रवंशी, चक्रधर पाटील देवसरकर, राष्ट्रीय किसान मोर्चा चे पुंजाराम हटकरे, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे गणपत गव्हाळे, खालिद भाई, जब्बार भाई, तिलक राठोड, हन्नान ठेकेदार, समाधान पंडागळे हे होते.

“सदर कार्यमाला प्रशासनाने प्रचंड राजकीय दबावापोटी कार्यक्रम रोकण्याचा प्रयत्न केला. असा आरोप करीत जर प्रशासन संविधानाच्या आर्टिकल 19 चे उल्लंघन करीत असा व्यवहार करत असेल तर आम्ही भविष्यात कायदेशीर मार्गाने राष्ट्रव्यापी लढा उभारून संविधान वाचविण्यासाठी समाजाला जागृत करू असे आणि त्यासाठी आम्ही वेळ पडल्यास जेलभरो आंदोलन करू…! असे परखड मत कार्यक्रमाचे आयोजक भारत मुक्ती मोर्चा चे तालुकाध्यक्ष, युवा नेतृत्व प्रकाशभाऊ कांबळे यांनी केले.
सदर कार्यक्रमाची चर्चा ढाणकी परिसर आणि उमरखेड तालुक्यात सर्वत्र होती.

अश्या परिस्थितीत हा कार्यक्रम कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवत शांततेत पार पडला.

अठरापगड जाती धर्मातील मूलनिवासी बहुजन बांधव ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधान जाणून घेतले पाहिजे असे सांगत एकतेचा संदेश देत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी पोलिस प्रशासनाचा तगडा बंदोबस्तात दिसून आला.

ह्या कार्यक्रमाचे संचलन विद्वान केवटे, प्रास्ताविक अमोल पाटील तर यशस्वितेसाठी धनगर समाज संघटनेचे समाधान पंडागळे, बिन चे मिलिंद चिकाटे, संजय बनसोडे, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा चे शेख जब्बार भाई, पुंडलिक तलवारे,मक्सुद भाई, छत्रपती क्रांती सेना चे संतोष पाटील चंद्रवंशी, दिलीप कलाले,शाहरुख भाई, मुन्नवर भाई,दीपक पाटील चंद्रवंशी,अमिन भाई, नजर भाई, सूरज मोरे, दिनकर वाठोरे,दाऊद भाई, अदनान भाई, अभिजित चव्हाण,अतिक भाई, अक्षय सूर्य साहिल भाई, कैलास वाठोरे, भुरकेसर यांसह अनेकांनी परिश्रम घेतले.