उमरखेड येथील एसटी आगारात संविधान दिन साजरा

120

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर ( जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि.26 नोव्हेंबर)
प्रत्येक भारतीयांना मान सन्मान स्वाभिमान व सामाजिक संस्कार घालणाऱ्या अनेक बाबी जाणीव पुर्वक दुर्लक्षित केल्या जाते ही खुप मोठी शोकांतिका आहे.

त्यापैकी च एक सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे भारतीय संविधान. भारतीय संविधान हे सर्वोच्च असून संविधानानुसार च देशाचा कारभार चालत असतो.

संविधानाचा सन्मान करने हेच सर्वात मोठे राष्ट्रप्रेम आहे.
ज्या संविधानाने माणसाला माणसात आणुन सर्व हक्क अधिकार बहाल करून, विषमता व भेदभाव नष्ट करून प्रत्येकाला भारतीय बनवले. तेच संविधान राष्ट्रीय ग्रंथ आहे. व त्याच संविधानाचा सन्मान करणे आणि संविधाना विषयी जागृती करणे यालाच राष्ट्र सन्मान व राष्ट्रभक्ती म्हणतात.

ज्या संविधानाने मान सन्मान स्वाभिमान दिला, शिक्षण रोजगार सुविधा दिली, अनेक अधिकार दिले, जनतेला राजा बनवले याची जाणीव ज्यांना नसेल त्यांना राष्ट्रप्रेमी म्हणायचे कसे? राष्ट्रप्रेमी होण्यासाठी राष्ट्राचा अर्थ समजून राष्ट्राचा व राष्ट्रीय संपतीचा सन्मान तर करता आला पाहिजे. संविधान केवळ देश चालण्याचे पुस्तक नाही. करोडो कुळांचा उद्धार करण्याचा एकमेव महामार्ग आहे.

नोकरी, शिक्षण, आरक्षण, हक्क अधिकार हे सर्व संविधानाने दिलेले आहे. संविधाना पुर्वी तर शाळा शिकणेही पाप समजले जायचे म्हणून तर शाळा नव्हत्या. ब्रिटिशांनी शाळा सुरू करून दिल्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार दिला.

संविधानाने दिलेले हक्क अधिकार व सुख सुविधेचा
२० जुलै १९४२ साली मजूर मंत्री झाल्यानंतर डॉ बाबासाहेबांनी एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतला जो अतिशय दूरगामी ठरला. या निर्णयानुसार जे अनुभवी मात्र अर्धशिक्षित तंत्रज्ञ तयार होत होते त्यांना नोकरीसाठी भटकंती करावी लागू नये म्हणून बाबासाहेबांनी Employment Exchange स्थापन केले. त्यामुळे अनेक तरुण तरुणींना नोकरीसाठी अनेक ठिकाणांवरून बोलावणे येऊ लागले. त्यांच्या नोकरीचा प्रश्न सुकर झाला.

मंत्रिपदाच्या काळात बाबासाहेबांनी काही क्रांतिकारक निर्णय घेतले ज्याच्या फायदा समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना झाला – १.) स्त्रियांना कारखाना कायद्या अन्वये रात्री काम करण्यास बंदी २.) स्त्रियांना प्रसूती काळात भर पगारी सुट्टी ३.) बारमाही कामगारांना आपल्या हक्काची भर पगारी सुट्टी ४.) सक्तीची तडजोड किंवा लवाद हे तत्व कामगारांच्या न्यायासाठी कायम स्वरूपाचे केले.

१९४५ साली बाबासाहेबांनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला ज्याचा आजही सर्व नोकरदारांना फायदा मिळतो. कामगारांना जो महागाई भत्ता त्याकाळी मिळायचा तो खूप अपुरा होता व दरवर्षी वाढणाऱ्या महागाईला तोंड देताना कामगारांना खूप त्रास व्हायचा. म्हणूनच बाबासाहेबांनी निर्णय घेतला कि महागाईच्या निर्देशांकाच्या आधारावर महागाई भत्ता देण्यात यावा.

आज सर्व कामगारांना मिळणारा महागाई भत्ता हा बाबासाहेबांनी १९४५ साली घेतलेल्या निर्णयामुळे मिळतो हे लक्षात घेतले पाहिजे. याचाच अर्थ, मजूर मंत्री असताना बाबासाहेबांनी घेतलेले निर्णय हे कुठल्याही विशिष्ट जातीला समोर न ठेवता, समाजातील सर्व जाती धर्माच्या कामगारांच्या हिताचे असतील असे निर्णय घेतले.

या देशातील प्रत्येक नागरिक घेतो तो श्वास आणि खातो तो घास ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देणं आहे.

या कार्यक्रमास आगारातील प्रकाश भदाडे आगार व्यवसथापक, मनवर ATS, भरत वाठोरे,राहुल गायकवाड, दत्ताराव उगले, सुनील वानरे , एल एम पवार,सुनील गंगावणे,नावेद शेख, अविनाश जाधव, शेख मदार, आमोळ माळवे,सुनील धुळे रा.प कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.