शुद्ध आचरणाशिवाय भक्ती व्यर्थ-शिवशंकर नागरे

88

 

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद- सर्वीकडे भजन, कीर्तन, प्रार्थना, प्रवचन सुरू आहे. तरी समाज परिवर्तन होत नाही. याचे कारण केवळ शब्दाने सांगून चालत नाही तर तुम्ही बोलता कसे यापेक्षा कुटुंब व समाजात वागता कसे याला जास्त महत्त्व आहे. शुद्ध आचरणाशिवाय सर्व व्यर्थ असल्याचे प्रतिपादन शिवशंकर नागरे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज्यांच्या पुण्यतिथी प्रसंगी श्रीरामपूर येथे केले.

जिल्हा सेवाधिकारी गणेश धर्माळे यांच्या पुढाकाराने श्रीरामपूर येथिल भव्य प्रांगणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी अर्थात सर्व संत स्मृतिदिनाचे भव्य आयोजन करण्यात आले. प्रथम मान्यवरांच्या हस्ते अधिष्ठान पूजन दीपप्रज्वलन करून राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना-अर्जिपद-नामधून-नामजप-ग्रामगीता ग्रंथ वाचन- आत्मचिंतन- शांतीपाठ घेण्यात आला.
यावेळी भीमराव महाराज, प्रा. नंदकुमार खैरे, प्रा. शरद राऊत, प्रा., महादेव गावंडे, उत्तम शेळके यांनी राष्ट्रसंतांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. पुढे बोलतांना नागरे म्हणाले की आपल्या हृदयात आईवडील कुटुंब समाजाप्रती प्रेम, दुःखी कष्टी लोकांबद्दल जिव्हाळा व देशाप्रती निष्ठा आवश्यक आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त वृद्धाश्रम आहेत हि शोकांतिका आहे घराघरात संपत्तीसाठी कलह,आपसात हेवेदावे, गावात वाद हे दूर झाले पाहिजे.बाह्यांग व्यक्तित्व घातक आहे राष्ट्रसंतांचे जीवनचरित्र गंगेचच्या पाण्याप्रमाणे निर्मळ आहे तसे आपण आतून बाहेरून निष्कलंक राहून प्रांजळपणे वागत असू तर भक्ती फलद्रुप होईल.त्यानंतर राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तालुका प्रचारक नरेश ढाले यांची निवड जनजाती सुरक्षा मंच पुसद जिल्हा सहसंयोजक पदी नियुक्ती झाल्याबद्दल ह.भ.प.ज्ञानेश्वर इंगोले, उत्कृष्ट गायक तलाठी गजानन कवाने यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भजन संध्येचा कार्यक्रम होऊन राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमात प्रमोद जयस्वाल,अशोक भगत,अनिल अस्वार, प्रशांत आत्राम, पंजाबराव गडदे, बाबासाहेब वाघमारे, कैलास मस्के, किसन गरडे, अरुण इंगळे, सुधाकर कपटे, दशरथ सोनटक्के, शिवलिंग पटवे, शंकर सोळंके, विठ्ठल यावले, प्रभाकर चव्हाण, सुभाष जाधव, नरेंद्र गेडाम, मुकींदा ढोले,सुरेश कदम, लक्ष्मण गोवेकर, प्रमोद धर्माळे, सच्चीदानंद बोंपिनवर, ऋषभ तोडसाम, शिवप्रसाद पटवे, किसन राऊत, भाऊ घुमनर,शंकर संघई,जितेंद्र किन्हेकर, भगवान काळे, गजानन आरगुलवार, पांडुरंग थोरात, मनोज माळोदे, संतोष देवसरकर,यशवंत भगत, संजय चव्हाण सह असंख्य स्त्रीपुरुष बालगोपाल मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्याम चाणेकर,आनंद शिरडकर, प्रतिभा विठ्ठल निस्ताने,नेहा पंडित अडतकर, कस्तुरी,भूमिका, स्मिता धर्माळे, शर्वरी, देवश्री, मुक्ता काळबांडे यांनी अथक परिश्रम घेतले.