पशुसंवर्धन योजनेचा लाभ घेवून बेरोजगारीवर मात करा-आमदर डॉ. गुट्टे यांचे आवाहन

79

 

 

अनिल साळवे, प्रतिनिधी

गंगाखेड (प्रतिनिधी):-
सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांच्यासह इतर घटकांसाठी शासन वेळोवेळी लोकोपयोगी योजना सुरू करीत असते. त्याचा योग्य घटकांना चांगला फायदा होत असतो. त्यामुळे शासनाचा हेतू साध्य करण्यासाठी पशुसंवर्धन योजनेचा लाभ घेवून बेरोजगारीवर मात करा, असे आवाहन गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी तात्काळ अर्ज भरून पशुसंवर्धन विभागाच्या सर्व योजनांसाठी अर्ज करायला हवेत. त्या योजनांमध्ये दुधाळ गाय व म्हशींचे वाटप करणे, शेळी व मेंढी गट वाटप करणे, १०० कुक्कट पिलांचे वाटप व २५ अधिक ३ तलंगा गट वाटप करणे, यांचा समावेश आहे.

त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी येत्या ८ डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत. पात्र लाभार्थींची निवड ऑनलाईन पध्दतीने होईल. एका कुटुंबात एकाच व्यक्तीला, एकच योजना घेता येईल, असे निकष आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांनी पासपोर्ट साईज फोटो, बँक पास बुक, मोबाईल नंबर, रेशनकार्ड, कुटुंबातील सर्वांचे आधारकार्ड अशी सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. तरी अर्ज करू इच्छित पात्र घटकांनी शासकीय योजना मदत केंद्र, राम सीता सदन, कोद्री रोड, गंगाखेड येथे उपस्थित राहून नावनोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी केंद्र समन्वयक अभिजीत चक्के यांना ८८३०९४९९८४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन आ.डॉ.गुट्टे यांनी केले आहे.