शब्द वाटू धन जनलोका : रामकृष्ण नवले

118

✒️अहमदनगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहमदनगर(दि.17फेब्रुवारी):- ‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ॥ शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका ||
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव | शब्दचि गौरव पूजा करु ॥ तुकाराम महाराज यांच्या या अभंगातून मिळणारा संदेश नेवासा तालुक्यात गावो – गावी शब्दगंध साहित्यिक परिषद नेत आहे, त्यामुळें सर्वसामान्य जनता पुस्तकं साक्षर होत आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे’ असे मत भेंडा येथील जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी कार्यालयीन अधीक्षक रामकृष्ण नवले यांनी काढले.

ते शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य नेवासा शाखेच्या फिरते वाचनालय आपल्या गावात या उपक्रमांतर्गत नेवासा तालुक्यातील भेंडा गावात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शब्दगंध साहित्यिक परिषद एक प्रकारे वाचन संस्कृती जोपासण्याचे काम करीत असून नेवासा तालुक्यातील दानशुर व्यक्तिंनी, सामाजिक संस्थांनी,निवृत्त सेवकांनी या उपक्रमास पुस्तके भेट द्यावीत,म्हणजे ही ज्ञानगंगा नेवासा तालुक्यात अविरत प्रवाहित राहील.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भेंडा खुर्द चे सरपंच वैभव नवले होते. प्रथमतः शब्दगंध नेवासा शाखेचे उपाध्यक्ष दिगंबर गोंधळी यांनी संबळ वाद्य वाजवून वातावरण निर्मिती केली व उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.शब्दगंध नेवासा शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.किशोर धनवटे व सल्लागार,कृषी शास्त्रज्ञ, माजी कुलगुरू डॉ.अशोक ढगे यांनी आजच्या मोबाईलच्या काळात पुस्तक वाचनाचे महत्त्व विशद केले.

शेवटी शब्दगंधचे उपाध्यक्ष पांडुरंग रोडगे यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले. या प्रसंगी ग्रामस्थ सुरेश वाघमारे, कचरू सावंत, रावसाहेब रोडगे , शिवाजी वीर,अशोक जाधव, पवन रिठे,नारायण गोमाणे,महेश आरगडे,गौरव आरगडे ,प्रताप निकम, जयसिंग देशमुख, रामकृष्ण नवले, प्रविण शिंदे , आण्णा कुऱ्हाडे,आसाराम लवांदे, कृष्णा विधाटे,ज्ञानेश्वर गंगावणे, ईश्वर उगले,भानुदास कदम, बन्सी गिर्हे,नितिन साबळे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.नियमितपणे हा उपक्रम होत असल्याबद्दल शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी समाधान व्यक्त केले.