जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करा – माजी आमदार उत्तमराव इंगळे

68

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड:- (दि. 5 डिसेंबर) आदिवासी समाजातील मुला मुलींनी शिक्षण घेत असताना मनलाऊन अभ्यास करावा तसेच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवा शुन्यामधून विश्व निर्माण करण्याची ताखत तुमच्यात आहे यशाच्या आड परिस्थिती येत नाही असे अनेक उदाहरणे भूतलावावर आहेत असे प्रतिपादन माजी आमदार उत्तमराव इंगळे यांनी केले.

भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आणि समाजातील गुणवंताचा सत्कार या आयोजीत कार्यक्रमात उद्धघटक म्हणून ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवा निवृत्त गटशिक्षणाधिकारी प्रकाश शिकारे तर व्यासपीठावर व्यासपीठावर प्रा. डॉ. राजेश धनजकर, लक्ष्मणराव करूडे, फकीरराव धनवे, वैद्यकीय अधिकारी डॉ चंद्रकांत रिठे,डॉ नामदेव सरकुंडे, उत्तमराव पांडे,गजानन गायकवाड, कुलदीप रिठे, किसन भिसे,तुकाराम भुरके,देविदास मोहकर, लक्ष्मण धुमाळे,नामदेव मुरमरे,के सी खंदारे,उपस्थित होते.

पुढे बोलतांना उत्तमराव इंगळे म्हणाले देशा मध्ये कुठेही आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर समाजाने त्याविरोधात एक जुटीने विरोध केला पाहीजे समाज जर एकछत्रा खाली एकजुटीने राहील तर कोणाची समाजावर अन्याय करण्याची हिंमत होणार नाही.

समाजाच्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या मागण्या शासनाकडून मान्य करून घेता येतील समाजाच्या एकजुटीवर शासनाला धारेवर धरले जाते याची बरीच उदाहरणे आहेत समजा समोर कोणीही मोठा नाही असे ते म्हणाले. तसेच आदिवासी हा IPS अधिकारी झाला पाहीजे असे स्वप्न उराशी बाळगून मुला मुलींनी अभ्यास करावा..! असे आवाहन माजी आमदार इंगळे यांनी केले.

प्रा डॉ राजेश धनजकर, लक्ष्मणराव करूडे, प्रकाश शिकारे यांनी समाजप्रबोधन पर मार्गदर्शन केले तत्पूर्वी भगवान बिरसा मुंडा सार्वजनीक जयंती महोत्सवाचे उद्घाटन माजी आमदार उत्तमराव इंगळे, डॉ राजेश धनजकर, लक्षमण करूडे, प्रकाश शिकारे, समितीचे अध्यक्ष फकीरराव धनवे यांचे हस्ते करण्यात आले.

आदिवासी विद्यार्थी साठी लवकरच उमरखेड येथे अकॅडमी सुरू करणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली सदरील कार्यक्रम क्रांती सुर्य बिरसा मुंडा सार्वजनीक जयंती महोत्सव समितीने दि.३ डिसेंबर रविवारी स्थानिक बाजार समिती प्रगणात आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल खूपसे, आभार प्रदर्शन कैलास गारोळे यांनी केले यावेळी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.