मिलिंद महाविद्यालय मुळावा जागतिक एड्स दिनानिमित्ताने सुकळी गावात जनजागृती रॅली

50

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड : – (5 डिसेंबर) तालुक्यातील मिलींद महाविदयालय मुळावा येथे रासेयो पथकाव्दारा 1 डिसेंबर 2023 रोजी जागतिक एडस दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सुरवातीला संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर एड्स संबंधी माहिती प्रसारित करण्यासाठी आणि कलंक व भेदभाव रोखण्यासाठी सर्व रासेयो स्वयंसेवक व प्राध्यापकांनी शपथ घेतली रॅलीचे उद्घाटन प्रा डॉ. डी एस पवार यांनी केले रासेयो स्वयंसेवकांनी HIV विषाणू एड्स आजाराबाबत जनजागृती पर घोषवाक्य तयार केली होती ग्रामीण भागातील जनतेमध्ये एड्स आजाराबाबत असणारे गैरसमज दूर करून जनतेमध्ये जनजागृती करणे हा या रॅलीचा उद्देश होता.

1097 या हेल्पलाइन नंबर बद्दल सुद्धा नागरिकांना माहिती देण्यात आली या रॅलीमध्ये प्रा. क्रांती मुनेश्वर, पांडुरंग शिंदे, लक्ष्मण केवटे , गजानन खिल्लारे यांच्यासह मोठ्या संख्येत राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व रेड रिबन क्लब संयोजन प्रा.ज्योती खंदारे यांनी केले तालुका समन्वयक एड्स नियंत्रण कक्ष, यवतमाळ वैशाली धोंगडे उपजिल्हा रुग्णालय उमरखेड यांनी विद्याथ्यांचे अभिनंदन केले.