शालेय पोषण आहार – अंडी व केळी योजना बाजारभाव प्रमाणे देण्याचे शासनाचे आश्वासन- पुरोगामी ची मागणी

143

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.15डिसेंबर):-शासनाने शालेय पोषण आहारातंर्गत विद्यार्थ्यांना या महिन्यापासून आठवड्यातून १ दिवस अंडी व केळी हा सकस आहार देण्यास देण्यास सुरुवात केली असून लवकरच बाजारभावाप्रमाणे अंडी व केळी चे दर निश्चित केले जातील असे आश्वासन शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव इम्तियाज काझी यांनी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळास दिले.

नागपूर मंत्रालय येथे पुरोगामी शिक्षक संघटना प्रतिनिधी मंडळाने शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव इम्तियाज काझी यांची भेट घेवून अंडी व केळी साठी निश्चित केला रू.५ हा बाजारभावापेक्षा कमी असल्याने सदरचा दर बाजारभाव प्रमाणे देण्यात यावा अशी मागणी केली होती. याबाबत पुढील निधी देतांना बाजारभाव पाहून निश्चित केला जाईल असे शासनाच्या वतीने सांगण्यात आले.यावेळी ज्या शाळांना अजूनही निधी प्राप्त झाला नाही तो निधी लवकर पाठवण्यात यावा, सकस आहार निधी किमान १५ दिवस आधी खात्यावर जमा करण्यात या मागण्यांबाबतही सकारात्मक चर्चा झाली.

शिष्टमंडळात संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य कार्याध्यक्ष प्रकाश पाध्ये, राज्य उपाध्यक्ष जी. एस मंगनाळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस.के.पाटील, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार, वाशिम जिल्हाध्यक्ष इरफान मिर्झा, अकोला जिल्हाध्यक्ष संघर्ष सावरकर, रत्नागिरी नेते प्रदीप पवार, जालना जिल्हाध्यक्ष दिनकर पालवे,कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस तुषार पाटील वाशिम जिल्हा सरचिटणीस प्रदीप गावंडे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष जीवन भोयर, लोमेश येलमुले, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत टिपूगडे, वाशिम जिल्हा उपाध्यक्ष भाऊराव शिंदे, नागपूर अध्यक्ष लिलाधर सोनवणे, सरचिटणीस विनोद गवारले आदी उपस्थित होते .