स्वतंत्र विदर्भ झाल्यास काय मिळणार आहे?

1374

🔸विदर्भातील ३ कोटी जनतेने आपल्या आणि आपल्या मुला/मुली यांच्या भविष्याचा विचार करा आणि स्वतंत्र विदर्भ झाल्यास काय मिळणार आहे हे समूजून घ्या ।

▪️1) महाराष्ट्रातील इतर विभागापेक्षा विदर्भात वन संपदा, खनीज संपदा आणि वीज उत्पादन भरपूर आहे. म्हणून विदर्भातून गोळा होणारा महसूल हा विदर्भ राज्याच्या विकासासाठी परिपूर्ण किंवा जास्त आहे.

▪️2) विविध क्षेत्रातील कलाकार, खिलाडी, पत्रकार, मिडीया कर्मी आणि साहित्यीक लोकांच्या उत्थानासाठी विशेष बजट राहील. आज महाराष्ट्रा सोबत असल्यामुळे उपरोक्त लोकांनकडे दुर्लक्ष होत आहे.

▪️3) स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यास विदर्भातील ११ जिल्ह्यातील विकासाचा आराखडा स्वतंत्रपणे राबविता येईल, कारण मुबलक संसाधने उपलब्ध आहेत. याकरीता मुंबईचे खेटे झिजवण्याची गरज पडणार नाही.

▪️4) विदर्भात सर्वात जास्त विज निर्मितीचे प्रकल्प आहेत. त्यामुळे २४ तास मुबलक वीज पुरवठा माफक दरात आणि शेतकऱ्यांना संपूर्ण सोई सहजपणे उपलब्ध होईल. सर्व शेती उपजसाठी एम.एस. पी. निर्धारीत करण्यात येईल. त्यामुळे शेतकरी आत्महत्या पूर्णपणे थांबेल.

▪️5) स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यास रोजगाराची मोठी प्रक्रिया विदर्भ राज्यात निर्माण होईल. विविध विभागांची पुनर्रचना, नविन व्यवस्थात्मक विभागांची निर्मितीमुळे विदर्भातील किमान ५० लक्ष तरुणांना सहजपणे नोकऱ्या आणि रोजगार प्राप्त होईल.

▪️6) शिक्षणाचा स्वतंत्र विदर्भ राज्याचा बजेट असेल. आज मुंबईत तयार होणाऱ्या या बजेटमध्ये विदर्भावर ६३ वर्षापासून अन्याय होत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याचे शैक्षणिक बजेट मध्ये विविध शाळेत, महाविद्यालय, विद्यापीठ, यांना भरपूर सुविधा देऊन दर्जेदार शिक्षण, वैद्यकीय, तांत्रिक व व्यवसाहीक सहजपणे उपलब्ध होईल.

▪️7) विदर्भात बहुतेक जिल्हे आदिवासी बहूल आहेत. स्वतंत्र विदर्भ झाल्यास आदिवासींचे पलायन, कुपोषण व शोषण थांबविता येईल. विविध रोजगार प्रकल्प उभारून नक्षलवादी चळवळीस थांबविता येईल. विकासाच्या प्रक्रियेत आदिवासींना सामिल करून प्रतिनिधित्व देता येईल. कारण आपल्याकडे सरप्लस वन उपलब्ध आहे जेणे करून आदिवासींना शेतीपट्टे देण्यात येईल.

▪️8) विदर्भात ओ.बी.सी. ची मोठी चळवळ आहे. मात्र या चळवळीतून येणाऱ्यांना नेतृत्व देण्याची मानसिकता मुंबईत बसून राजकरणाऱ्यांची नाही. स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यास ओबीसी नेत्यांना सक्षम राजनैतिक नेतृत्व मिळेल.

▪️9) विदर्भ राज्य स्वतंत्र झाल्यास एस.सी., एन.टी., विजेएनटी यांचा संपूर्ण बॅकलॉग त्वरित भरून काढण्यात येईल.

▪️10) विदर्भ राज्य स्वतंत्र झाल्यास अल्पसंख्यांका साठी स्वतंत्र अल्पसंख्यांक मंत्रालय निर्मिती करून त्यांना योग्य विकासात प्रक्रित समाविष्ट करता येईल.

▪️11) महिलांचे आरक्षण आणि प्रतिनिधीत्वाची संपूर्ण अमलबजावणी करणारे विदर्भ हे पहिले राज्य असेल.

▪️12) मेडिकल युनिव्हर्सिटी हे नागपूरात प्रस्तावित असतांना पश्चिम महाराष्ट्रात हस्तांतरीत करण्यात आले. विदर्भ राज्य निर्मिती नंतर विद्यापीठ विदर्भात स्थापित करण्यांत येईल. आरोग्य सेवासाठी स्वतंत्र बजेट राहील आणि प्रत्येक जिल्ह्यात उत्कृष्ठ वैद्यकीय सोई उपलब्ध राहतील.

▪️13) स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यास विदर्भातील वस्त्र, हस्त उद्योग आणि ग्रामीण उद्योगांना विस्तृत आर्थिक व तांत्रिक पाठबळ देऊन मोठी बाजारपेठ निर्माण करता येईल.

▪️14) गृहमंत्री आपले विदर्भाचे असले तरी सध्या विदर्भाच्या सर्व पुलिस ठाणे व इतर सरकार कार्यालयात ८० ते ९० टक्के अधिकारी बाहेरचे आहेत. विदर्भ राज्य झाल्यानंतर विदर्भाच्या पुलिस थाने व सरकारी कार्यालयात ८० ते ९० टक्के हे आपले वैदर्भिय लोक राहणार.

▪️15) विदर्भात रोजगार नसल्यामुळे आपले वैदर्भिय युवकाना पुणे, नासिक, मुंबई, बेंगलोर जाने ही मजबूरी असून ते तिथे जातात आणि त्यांचे ह्या पलायन मुळे विदर्भाची जन संख्या कमी झाली असून विदर्भाचे चार आमदार आणि एक खासदार कमी झाले म्हणजेच चार आमदार एक खासदार मार्फत विदर्भाला मिळणारा करोडो रूपयांचा फंड कमी झाला आहे. रोजगारा साठी हा पलायन विदर्भ राज्य होई पर्यंत थांबणार नाही म्हणजेच समोर अजून आमदार खासदार कमी होतील हि बाब कोणीही नकारू शकत नाही.

▪️16) ज्यावेळी काँग्रेसची सरकार होती त्यावेळी बी. जे. पी. यांनी आपले उडीसा अधिवेशनात मा. नितिन गडकरी साहेब यांनी लिखित रूपात म्हटले होते कि, जर बी.जे.पी. ची सरकार आली तेव्हा आम्ही विदर्भ राज्याची निर्मिती करू. मा. देवेन्द्र फडणविस साहेब यांनी सांगितले होते कि, जो पर्यंत विदर्भ राज्य होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. सध्या केंद्रात बी.जे.पी. ची सरकार आहे आता काय झाले? पुर्वी जेव्हा बी. जे. पी. शिवसेना सोबत होती त्यामुळे बी. जे. जे.पी. चे लोक म्हणायचे होते की आमचे सोबत शिवसेना आहे ते विदर्भ राज्य विरोधी आहे. म्हणून आम्ही विदर्भ राज्य निर्मिती करू शकत नाही, बरे झाले त्या वेळी त्यांना विदर्भ राज्य हा बहाना करून नाकारले पण सध्या बी.जे.पी. ची कट्टर विरोधी ही शिवसेना यांचे विरोधा आहे तरी आता बी.जे.पी. विदर्भ राज्याची निर्मिती का करत नाही ? या प्रश्नाचे उत्तर देवेन्द्र फडणविस व बी.जे.पी. चे इतर लोक देतील काय ?

▪️17) जे लोक खुलेपणाने विदर्भ राज्य विरोधी आहेत हे आपण समजू शकतो. पण जे बी.जे.पी. चे विदर्भ राज्य समर्थक असणारे लोक आहेत ते लोक विदर्भ राज्यांची निर्मिती का करत नाही? पश्चिमी महाराष्ट्राचे उद्योगपती आणि आपले नेत्या मध्ये घालमेलचा एक मोठे षडयंत्र आहे. आणि ते असे आहे कि ते मोठे उद्योग नोट छापणारे उद्योग पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात ठी स्थापित आहेत आणि त्याला सुरू ठेवण्यासाठी वीज, कोयला, वन संपदा हे विदर्भातुन मिळतात. विदर्भ राज्य झाल्यानंतर ही सुविधा त्यांना मिळणार नाही म्हणून हे उद्योगपती विदर्भ राज्य निर्मितींचे विरोधात आहे. याचे एक उदाहरण आहे कि काही वर्ष पुर्वी रतन टाटा नागपूरात आले होते आणि त्यांनी विदर्भ राज्याची आवश्यकता नाही असे म्हटले होते. आता तुम्ही समजून घ्या त्यांचे एकच कारण आहे कि विदर्भ राज्य नंतर हि सुविधा त्यांना मिळणार नाही विदर्भ राज्य निर्मिती करून बी.जी.पी. द्वारे तिकडचे उद्योगपती यांना नाराज करता येणार नाही.

▪️18) भारताचा नकाशा वर मराठी दोन राज्य होणे ही गर्वची बाब आहे कि दुखःची, तुम्हीच गंभीरतेने विचार करा.

▪️19) वैदर्भिय लोकांना आपल्या समस्यासाठी १००० कि.मी. मुंबई जाने ही किती कठीण आहे ह्याचा सुद्धा सर्वांना विचार करा ? विदर्भ राज्य झाल्यानंतर बस, बाईक, किंवा बैलगाडीने नागपूरात असलेले विधान भवनला जाऊन संधाकाळी आपले घरी परत येऊ शकता.

▪️20) शेवटचा महत्वपूर्ण मुद्दा समजून घ्या, महाराष्ट्राचे एकूण आमदार २८८ आहे या पैकी विदर्भाचे फक्त ६२ आहे.मुंबईत असलेली महाराष्ट्राची तिजोरी ही मराठवाडा पश्चिमी महाराष्ट्राचे २२६ आमदाराच्या ताब्यात आहे. तिकडचे हे २२६ आमदार मुंबई असलेल तिजोरी मधुन विदर्भाची जनता साठी कधिच माफक माप देणार नाही म्हणून विदर्भचा बॅकलाग १५० कोटी पर्यंत गेला आहे. जो पर्यंत विदर्भ राज्य होत नाही तो पर्यंत आपले वैदर्भीय मंत्री तिकडचे २२६ आमदार यांचे दबावा खाली राहणार आहेत. याचे उदाहरण गृहमंत्री देवेन्द्र फडणविस ही आपले विदर्भाचे असून विदर्भाचे पुलिस थान्यात ८० ते ९० टक्के अधिकारी हे सर्व पश्चिमी महाराष्ट्र मराठवाडा कोकणचे आहेत आणि आपले वैदर्भिय युवा नौकरी साठी दर बदल ची ठोकरे खात आहेत. जो पर्यंत विदर्भ वेगळा राज्य होत नाही तोपर्यंत वैदर्भिय जनतेला तिकडचे २२६ आमदारांची हिटलर शाहीतून छुटकारा मिळणार का हा तुम्हीच विचार करावा ?

▪️21) महाराष्ट्र वर लगभग ७ लाख करोडचा कर्ज आहे, ही रकम कोठे गेली, यांची भरपाई वैदर्भिये लोकांकडून होणार नाही का?

▪️22) छोटे राज्य झाल्यानंतर त्यांचे विकास कसे होतात हे समजून घ्या नविन घोषित झालेल्या राज्याचा जी.डी.पी कसा आहे. हे समजुन घेणे आवश्यक आहे. छत्तीसगढ ९.२%, मध्य प्रदेश ४.२%, झारखंड – 11.01%, बिहार – ४.७१%, उत्तराखंड ८.८%, उत्तरप्रदेश ४.६%, तेलंगाना – ९.८%, आंध्रप्रदेश ५.५% विदर्भवासी बंधू आणि भगिनिंनो आता तुम्हीच विचार करा, जर आमचे मत आमचे विचार तुम्हाला पटत असतील तर विदर्भ राज्य आंदोलनात सहभाग देऊन सहकार्य करावे कारण ह्या मागणी मागे आमचे कोणतीही राजनितीक स्वार्थ नाही हि मागणी फक्त वैदर्भीये किसान, बेरोजगार युवा, महिला आणि सर्व छोटे-मोठे व्यापायांचे उज्वल भविष्यासाठी आहे.

 

विदर्भ जॉईंट अॅक्शन कमिटी (विदर्भ)
कार्यालय : १) कस्तुरबा लायब्रेरी गाँधी चौक, सदर, नागपूर
२) २रा माळा, भुरे भवन, बैद्यनाथ चौक, नागपूर

फोन -7709497875, 9767040899